Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडा कोकण मंडळ सोडत काढणार नोव्हेंबर महिन्यात

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने 2023 मध्ये सलग दुसरी सोडत काढली असून या सोडतीला सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला

जगातील टॉप-25 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर
अन्यथा, जगाचा श्रीलंका होईल !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या गेटला कुलप कोणाचे ?

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने 2023 मध्ये सलग दुसरी सोडत काढली असून या सोडतीला सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात होऊन 20 दिवस झाल्यानंतर आणि अर्जस्वीकृतीला केवळ 10 दिवस शिल्लक असतानाही अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या अर्जांनी पाच हजारांचाही पल्ला पार केलेला नाही.
शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजेपर्यंत अनामत रक्कमेसह केवळ 3 हजार 840 अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाने 4654 घरांसाठी मे महिन्यात सोडत काढली. या सोडतीसाठी अनामत रक्कमेसह 49 हजार 174 अर्ज सादर झाले होते. सोडतीला चांगला प्रतिसाद मिळाला. पण प्रत्यक्षात योजनेनुसार 20 टक्के योजनेतील घरे वगळता इतर घरांसाठी अर्जच न आल्याने 4654 पैकी 2000 हून अधिक घरे विकलीच गेली नाहीत. पुढे विजेत्यांनीही मोठ्या संख्येने घरे नाकारली. त्यामुळे 2000 हून कमी घरांची विक्री मे 2023 च्या सोडतीत झाली. या सोडतीत घरे विकली न गेल्याने कोकण मंडळाने शिल्लक घरांसह 20 टक्के योजनेतील उपलब्ध अन्य घरांचा समावेश करून 5311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू होऊन आता 20 दिवस झाले असून अर्जविक्री-स्वीकृतीसाठी केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. असे असताना आतापर्यंत 5311 घरांसाठी केवळ 8 हजार 293 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. त्यातील केवळ 3 हजार 840 अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी असून कोकण मंडळाची चिंता वाढविणारा आहे. पुढील दहा दिवसांत अनामत रक्कमेसह 10 हजार तरी अर्ज येतील का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोकण मंडळाच्या सोडतीला मिळणार हा आतापर्यंतचा सर्वात कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे कोकणातील घरांना इच्छुकांची पसंती का मिळत नाही, याचा विचार करण्याची वेळ कोकण मंडळावर आली आहे.

COMMENTS