Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बौद्ध संस्कार संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

विद्यार्थ्यांना अधिकार्‍यांनी केले स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन

अहमदनगर ः शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोपे जाते, हा उदात्त हेतू डोळ

ब्राम्हणगावात महाराष्ट्र दिन उत्साहात
दुधाच्या दरासाठी आजपासून राज्यभर आंदोलन
नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…

अहमदनगर ः शालेय वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळाल्यास त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सोपे जाते, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर येथील बौद्ध संस्कार संघाकडून दहावी-बारावी उत्तीर्ण, तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संबोधी वसतिगृह फकीरवाडा येथे अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी मुंबई येथील सहायक राज्यकर आयुक्त विवेक घोडके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना येणार्‍या अडचणी आणि भविष्यातील संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी न्यूवे इंडस्ट्रियलचे संचालक निलेश पठारे यांनी गरजूवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम्ही तत्पर असल्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ. शांतीनाथ धनवे यांनी देखील वसतिगृहात आपण विद्यार्थ्यांना लागणार्‍या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. तसेच यावेळी इंजि. जगदीश दारोळे, अरविंद जाधव, डी. सी. तरकसे, इंजि. संजीव घोडके, इंजि. वसंतराव मेढे, अरविंद शिंदे, अ‍ॅड. बळीराम उके, प्रा. डॉ. अजय बगाडे, अनिल आंबावडे, संतोष आहेर, प्रा. डॉ. अमन बगाडे, प्रा विश्‍वासराव कांबळे, एम.बी. साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाची सुरूवात त्रिसरण पंचशील सिंधू तरकसे, विद्या शिंदे, पुष्पा मेढे, सातपुते मॅडम, वैशाली पठारे, प्रतिभा देठे, आशाताई कांबळे यांनी पठण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे म्हणाले की, बौद्ध संस्कार संघाकडून गेल्या 16 वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी विविध अधिकार्‍यांना बोलावून मार्गदर्शन करत आहेत. यातून विद्यार्थ्यांना अधिकारी वर्गांची ओळख व्हावी, त्यांनी देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेवून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी बौद्ध संस्कार संघ हा उपक्रम राबवित असल्याची माहिती देठे यांनी यावेळी दिली. यावेळी दहावी-बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांना अधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील देण्यात आले. तसेच सहायक राज्यकर आयुक्त विवेक घोडके अणि बौद्ध संस्कार संघाकडून विद्यार्थ्यांना 40 पुस्तके अभ्यासाठी भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी बहुजन शिक्षक संघाचे पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड, वसतिगृहाचे अधीक्षक नितीन कसबेकर, रवींद्र तपासे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. उपस्थितांचे आभार प्रा. अक्षय कांबळे यांनी मांडले.

माजी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज – संबोधी वसतिगृहात आजमितीस 75 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याच वसतिगृहात राहून अनेक विद्यार्थी मोठ-मोठया पदावर कार्यरत आहेत. त्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याच बांधवांच्या शिक्षणासाठी, त्यांना पायाभूत सोयी-सुविधांसाठी हातभार लावण्याची गरज आहे. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी या वसतिगृहाकडे पाठ फिरवल्याची खंत बौद्ध संस्कार संघासह अधिकार्‍यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आपल्या बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील यावेळी बौद्ध संस्कार संघाकडून करण्यात आले.

COMMENTS