Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या सदगुरु कन्या विद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

कर्जत ः कर्जत येथील सद्गुरू उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात 13 जुलै रोजी नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच

शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाली
नवीन आव्हाने स्वीकारणारा शिक्षक तयार व्हावा ः डॉ. प्रशांत दुकळे
बाबासाहेब भोस यांची शरद पवार गटात घरवापसीचे संकेत

कर्जत ः कर्जत येथील सद्गुरू उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात 13 जुलै रोजी नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदगुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे हे होते. श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्र गोरे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे सखाराम राजळे यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक प्राचार्या अवसरे यांनी केले. अकरावी कला व विज्ञान शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचे गुलाब, पेन व पुस्तक तसेच पाणी बाटली देऊन विद्यालयात स्वागत करण्यात आले.यानंतर विद्यालयातील कला व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, पुस्तक, पेन, गुलाब पुष्प व फोल्डर फाईल देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थिनीनी मनोगते व्यक्त केली. अकरावीच्या विद्यार्थिनींनी विद्यालयातील पहिल्या दिवसाचा अनुभव कथन केला. राजळे यांनी टीव्ही व मोबाईल यांचा वापर कमी करावा. वेळापत्रक तयार करून अभ्यासाला लागा आणि आपले ध्येय गाठा, असे आवाहन केले. संस्थेच्या अध्यक्षा कल्याणीताई नेवसे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. डॉ. शंकरराव नेवसे यांनी लवकरच विद्यालयासाठी नवीन अत्याधुनिक इमारत बांधणार असल्याची घोषणा केली. सूत्रसंचालन प्रा. थोरात यांनी केले. प्रा. गायकवाड यांनी आभार मानले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.

COMMENTS