Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक

पुणे : बैठकीत रावसाहेब दानवे व रणजितसिंह नाईक निंबाळकर व मान्यवर. फलटण / प्रतिनिधी : पुणे येथे केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब

वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री
फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर यांचा राजीनामा

फलटण / प्रतिनिधी : पुणे येथे केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे रेल्वे विभागीय कार्यालय येथे बैठक झाली.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लोकप्रतिनिधींसोबत शनिवार, दि. 23 रोजी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे रेल्वे विभागात सुरू असलेली विकासकामे, प्रवाशांच्या सुविधा, पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि रेल्वे विद्युतीकरण परियोजना, पायाभूत सुविधांची कामे, रेल्वे सेवा, गाड्यांना स्टॉपेज देणे, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना भू संपादन संबंधी मुद्दे, लेवल क्रासिंग गेट च्या आसपास पावसाळ्यात पाणी जमा होण्याची समस्या, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण होण्याची समस्या आदींबाबत रेल्वे राज्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीरंग आप्पा बारणे, आमदार राहुल कुल, महेश शिंदे, सुरेशभाऊ खाडे, संजय जगताप, भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती रेणू शर्मा यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींचे स्वागत केले. बैठकीला रेल्वेच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकी दरम्यान खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातील पुढील मुद्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. यामध्ये फलटण-पंढरपूर रेल्वे सुरू करणे, फलटण-पुणे रेल्वे वेळ बदलाबाबत व फेर्‍या वाढवणे, कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याबाबत, पिंक हिल रेल्वे पोलीस ट्रेनिंग सेंटर सुरु करणे, दौंड-भुसावळ रेल्वे पंढरपूरपर्यंत चालू करणे, रेल्वे थांबा विषयी कारवाई त्वरित करणेबाबत, किसान रेल्वे वेळेवर पोहोचावी व शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये. याबाबत माढा लोकसभा मतदार संघातील रेल्वे स्थानके दुरुस्ती, सुशोभिकरण व अद्यावत करण्यासंदर्भात तसेच सर्व रेल्वे स्थानकावर सिक्युरिटी वाढवणेबाबत, नवीन रेल्वे प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यातील भूसंपादन केले असलेल्या शेतकर्‍यांना त्वरित मोबदला मिळावा. तसेच रेल्वे मार्गालगतच्या शेतकर्‍यांच्या रस्त्यांच्या अडचणीबाबत त्वरित मार्ग काढण्यात यावा. याबाबत फलटण-बारामती रेल्वेमार्गासाठी भुसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी. या सर्व महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, रेल्वेचे अधिकारी वर्ग व मान्यवरांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली.
बैठकीला संबोधित करताना रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी पुणे रेल्वे विभागात सुरू असलेल्या विकास कामांबाबत सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकला. बैठकीस उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील विकासकामांना गती देण्यावर भर दिला. तसेच प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वे प्रकल्पात येणारे अडथळे याबाबत देखील मत मांडले व सूचना केल्या.

COMMENTS