Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत नामदेव महाराज शिंपी समाजाची बैठक उत्साहात

राहाता ः श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज राहाता यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराजांची जयंती संजीवनी शताब्द

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या फुले 10001 ऊस वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता
साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी तिपायले
नगर-आष्टी रेल्वे मार्गावर हायस्पीड रेल्वेची यशस्वी चाचणी

राहाता ः श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज राहाता यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराजांची जयंती संजीवनी शताब्दी सोहळा नुकताच पार पडला. त्याचा हिशोबाचा तपशील समाज बांधवांना देण्यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बापूसाहेब वैद्य, संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश करमासे यांच्या अध्यक्षतेखाली झाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
या बैठकीत श्री संत नामदेव संजीवनी शताब्दी सोहळा झालेला खर्चाचा हिशोब मांडून सर्व समाज बांधवांसमोर ठेवण्यात आला.तसेच समाजातील तरुण युवकांना श्री संत नामदेव शिंपी समाज राहाता या संघटनेमध्ये तरुणांना संधी देण्याची मागणी जेष्ठ नागरिकांनी केली. या आधारे या मागणीला जोर धरून समाजातील काही युवकांना संघटनेमध्ये अध्यक्ष,उप अध्यक्ष व सचिव म्हणून निवड करण्याचे ठरवले यामध्ये सर्वांनुमते नूतन अध्यक्ष म्हणून  सागर पाथरकर, उपअध्यक्ष लोकेश देव्हारे व सचिव सुनील देव्हारे यांची बैठकीमध्ये निवड करण्यात आली. नूतन पदाधिकार्‍यांचे सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे यावेळी सुरेश देव्हारे, नंदू पाथरकर,दत्ता देव्हारे,सागर करमासे,मंगेश देव्हारे,योगेश पाथरकर,विवेक देव्हारे, रमेश खांबेकर,भारत देव्हारे,सचिन देव्हारे,महेश देव्हारे,गिरीश पाथरकर, नितीन शेजुळ आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS