Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळ्यात बारा-बलुतेदार महासंघाची 20 मार्चला बैठक

अहमदनगर ः धुळे शहरात बारा-बलुतेदार महासंघ उत्तर महासंघाची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली असून, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील

डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे
आशा सेविकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवा – स्नेहलता कोल्हे
शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करा

अहमदनगर ः धुळे शहरात बारा-बलुतेदार महासंघ उत्तर महासंघाची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली असून, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील महासंघाच्या विभागीय, जिल्हा, तालुका, महिला पदाधिकार्‍यांनी आवर्जूून उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय राज्य प्रतिनिधी एकनाथ बोरसे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी केले आहे. या बैठकीला प्रमुख मागर्दशक म्हणून बारा-बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे, उद्धाटक म्हणून एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, लक्ष्मणराव वडले, मुकुंदजी मेटकर, ओबीसी नेते सोमनाथ साखरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या बैठकीत संत गाडगेमहाराज बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ जाहीर केल्याबदद्ल राज्य सरकारचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात येणार असून, यासोबतच उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन विस्तार, जिल्हा संघटन व महिला संघटन चर्चा, राज्य युवक संघटना, तालुकाध्यक्ष निवड चर्चा, येणार्‍या लोकसभा निवडणूक संदर्भात चर्चा, जातनिहाय जनगणना या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. याप्रसंगी चंद्रकांत गवळी, सतिषजी दरेकर, प्रतापजी गुरव, देवराजी सोनटक्के, किसनराव जोर्वेकर, साहेबराव कुमावत, विजय बिरारी, विजय पोहाणकर, सतिष कजबे, विजय पोपळघाट, दत्तात्रय चेचर, धनजंय शिंगाडे, डी.एन. कोळी, दामोधर बिडवे, ए.के. भोई, किशोर सूर्यवंशी, उपस्थित रहाणार आहे.

COMMENTS