Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षेसाठी उपाययोजना राबवाव्यात

लातूर प्रतिनिधी - लातूर शहराच्या चारही बाजूने होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे येणा-या काळात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार असून लहान मु

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतले खंडोबाचे दर्शन
कितीही वादळे येऊ द्या, लातूरचा देशमुख वाडा तिथेच

लातूर प्रतिनिधी – लातूर शहराच्या चारही बाजूने होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे येणा-या काळात अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार असून लहान मुले, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक यांच्यासाठी सदरील राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणे धोकादायक बनू शकते, याचा विचार करता लातूरच्या चारही बाजूने होणा-या राष्ट्रीय महामार्गावर नागरीकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत पावले उचलली जावीत, अशी सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी लातूर यांना केली आहे.

लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना पाठवलेल्या लेखी पत्रात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, शिक्षण, कृषी, उद्योग, व्यवसाय बाबतीत लातूरची गेल्या कांही वर्षात झपाट्याने वाढ होत आहे. यातच लातूर शहराच्या चारही बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे एक जाळे तयार होत आहे. लातूर शहराच्या या चारही बाजूने तयार होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा येणा-या काळात शहराच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग काम पूर्ण झाल्यास शहरातील चारही बाजूला असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती चौक, गरुड चौक, एकमत चौक, अहिल्यादेवी होळकर चौक या अत्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या तसेच बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. लहान मुले, शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक यांच्यासाठी सदरील राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणे धोकादायक बनू शकते याचा विचार करता लातूरच्या चारही बाजूने होणा-या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार, पायी जाणारे नागरीकांच्या सुरक्षित प्रवास आणि वाहतूक व्यवस्था यासाठी शहरालागतच्या नागरी वस्तीतून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, रंबल स्ट्रीप, पादचारी करीता असलेल्या फुटपाथला सुरक्षा ग्रील, यासह अन्य उपाययोजना करण्यात याव्यात असेही त्यांनी या पत्रात म्हंटले आहे.

COMMENTS