Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माथाडी कामगारांचा राज्यव्यापी बंदचा इशारा

मुंबई ः माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी माथाडी कामगार आक्रमक झाले असून, येत्या 14 डिसेंबरला माथाडी कामगारांनी एक द

मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’… सनरायझर्स हैदराबाद सोबत आज लढत
स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीसाठी 46 हजार अर्ज

मुंबई ः माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी माथाडी कामगार आक्रमक झाले असून, येत्या 14 डिसेंबरला माथाडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारून सरकारला जागे करण्याचा निर्धार केल्याची माहिती सोमवारी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.
नरेंद्र पाटील म्हणाले हे विधेयक आल्यास 80 टक्के माथाडी कायदा मोडीत निघेल. त्यामुळे कामगारांच्या न्याय हक्कावर गदा येईल. आगामी काळात होणार्‍या अधिवेशनात हे विधेयक पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीती कामगार आणि संघटनेत आहे. पाटील पुढे म्हणाले हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात बैठक बोलावून माथाडी संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे. दरम्यान येत्या 14 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये एपीएमसी, बंदरे, गोदाम, कंपन्यांमधील माथाडी कामगार सहभागी होणार असून महाराष्ट्रातील सर्व माथाडी संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत असेही पाटील यांनी नमूद केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS