चाचपडणारे भागवत !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाचपडणारे भागवत !

राजकारणात नेहमी चर्चेत रहावं लागतं, अन्यथा नेता विस्मरणात जाण्याचा धोका असतो, असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा प्रसार

*मराठा आरक्षणावर केंद्राची फेरविचार याचिका | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
 मोरबे धरणात सप्टेंबरपर्यतचा जलसाठा
लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती म्हणून नाराज झालेल्या मुलाने आईलाच संपवले

राजकारणात नेहमी चर्चेत रहावं लागतं, अन्यथा नेता विस्मरणात जाण्याचा धोका असतो, असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते. या उक्तीचा प्रत्यय आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमातून मुलायमसिंह यादव आणि मोहन भागवत यांचा एकत्रित बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर आली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यात हजर असणाऱ्या मुलायमसिंह यांच्या बाजूला सोफ्यावर बसलेले भागवत असा हा फोटो आहे. या फोटोला पाहून काॅंग्रेसने ट्विट केले की, ‘एस’ फार संघवादी! मुलायमसिंह हे राममनोहर लोहिया यांचे शिष्य असल्याने ते समाजवादी आहेत. याच समाजवादी शब्दाला कोट करित काॅंग्रेसने संघवादी असा लेखनात अपभ्रंश केला. उत्तर प्रदेशात आता तीन महिन्यांनी निवडणूका होऊ घातल्या असताना मुलायमसिंह यांचा अशाप्रकारे निवडणूक पूर्व प्रतिमा व्हायरल होण्याला काही राजकीय संदर्भ तर नाही ना? अशा शंका-कुशंकाना आता वाव मिळेल. मात्र, त्याचवेळी समाजवादी पक्षावर पूर्ण कमांड मिळवलेल्या मुलायम पुत्र अखिलेश यादव यांनी काॅंग्रेसच्या ट्विट ला उत्तर न देता एवढेच म्हटले की, आता इडी, इन्कम टॅक्स, अशा सर्व प्रकारचे पाहुणे येणार परंतु, समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील निवडणुकीत सर्वांचा सफाया करणार. आता फक्त समाजवादी! असं त्यांनी ठामपणे म्हटले आहे. मुलायमसिंह यादव हे समाजवादी जरूर राहिले परंतु त्यांचा समाजवाद लालूप्रसाद यादव यांच्या इतका आर‌एस‌एस शी संघर्ष घेणारा कधीच राहिला नाही! लालूप्रसाद यादव यांची प्रतिमा सातत्याने भ्रष्टाचारी राजनेता अशी संघ परिवाराने प्रसार माध्यमातून उभी केली. प्रशासनातील आस्तिनचे हस्तक अनेक राहिले ज्यांनी लालूंच्या विरोधात मोहीम चालवली. मात्र डगमगणार ते लालू कसले! अर्थात याठिकाणी विषयांतर होत आहे, असं आपणांस वाटेल, परंतु, हे विषयांतर नसून मुलायमसिंह यांची विचारांच्या प्रति निष्ठा ही सर्वकाही सांभाळून आहे. लालूप्रसाद यादव हे वैचारिक राजकारण करताना पूर्णपणे संघविरोधी आहेत. हा लालू आणि मुलायम यांच्यातला मुलभूत फरक! मुलायमसिंह आणि मोहन भागवत यांचे कार्यक्रमात एकाच बाकावर बसण्याचे सार्वजनिक जीवनात अनेक अर्थ निघतात. मुलायमसिंह सेक्युलर असले तरी ते धर्माने हिंदू आहेत. त्यामुळे, संघ परिवार जो अवैदिक हिंदू च्या माध्यमातून वैदिक हिंदुत्वाला सुरक्षित करू पाहताहेत काय?  संघाचा हिंदू धर्म वैदिक आहे तर बहुजनांचा हिंदू धर्म हा अवैदिक आहे. कदाचित, या फोटोचा राजकीय लाभ दोघांना होऊ शकतो, असे गृहीत धरलं तरी तसा लाभ करून घेण्यासाठी राजकीयेतर ज्या संघटनात्मक शक्ती लागतात त्या समाजवादी मुलायमसिंह यांच्याकडे नाहीत. त्यामुळे, संघ भाजपला त्याचा राजकीय फायदा होऊ शकेल, असा एक अंदाज बांधूनच काॅंग्रेसने तातडीने ट्विट केले; तर त्याला तितक्याच प्रभावीपणे अखिलेश उत्तर देऊन  काॅंग्रेस, भाजप यांना एका दमात चूप केले. तर दुसऱ्या बाजूला आज दिल्लीत ओबीसींची राष्ट्रीय परिषद होत असताना लालूप्रसाद यादव आणि शरद यादव यांना आवर्जून बोलवण्यात आले तर मुलायमसिंह यांना जाणीवपूर्वक टाळण्यात आले. त्याचे कारण देखील मुलायमसिंह यांच्या वैचारिक राजकारण व्यवहारात अधिक गोंधळयुक्त करण्यात आहे. त्यामुळे, दिल्लीत ओबीसी परिषद घेणाऱ्यांनी अखिलेश यांच्याशी संपर्क करण्याचे सुतोवाच केले आहे. थोडक्यात, काय तर ओबीसींचे राजकारण तत्व, व्यवहार आणि लढा याबाबतीत अधिक स्पष्ट व धारदार होणे गरजेचे असल्याने होणाऱ्या घडामोडींचा दबाव संघ परिवारावर वाढला आहे, त्यामुळेच ते ओबीसी नेत्यांशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असाच ‘ त्या ‘ फोटोचा अर्थ आहे! उत्तर प्रदेश हे राज्य केंद्रीय सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण असल्याने संघ आणि मोदी दोघांची चाचपडणी सुरू झाली. मात्र, ही चाचपडणी त्यांना चाचपडत ठेवणार असेच संकेत दिसताहेत!

COMMENTS