Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याणमध्ये इमारतीला भीषण आग

ठाणे ः सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका इमारतीमधील घराला आग लागल्याची घटना घडली. आज बुधवारी सव्वा आठ वाजण्याच

चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली गाडी.
फसव्या जाहिराती आणि ग्राहक
आ. बबनराव लोणीकरांवर गुन्हा दाखल

ठाणे ः सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असताना कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका इमारतीमधील घराला आग लागल्याची घटना घडली. आज बुधवारी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीमधील नेमकी आग कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा परिसरातील अमृत हेवन या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे. आज बुधवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळतात घरातील नागरिकांनी बाहेर धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, घरातील खिडकीच्या बाहेर ज्वाला दिसत होत्या. या आगीची झळ बाजूच्या घराला देखील बसली आहे.

COMMENTS