शिवसेना व विकास आघाडीकडून सभा पुढे ढकलण्याचे षडयंत्र ; इस्लामपुरातील राष्ट्रवादी  नगरसेवकांचा आरोप..

Homeमहाराष्ट्रसातारा

शिवसेना व विकास आघाडीकडून सभा पुढे ढकलण्याचे षडयंत्र ; इस्लामपुरातील राष्ट्रवादी नगरसेवकांचा आरोप..

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निधी आणला आहे म्हणून प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे विरोध करून सभा पुढे ढकलण्याचे षडयंत्र शिवसेना व विकास आघाडी करीत असल्याचा आरोप आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी पत्रकार परिषदेत केला.

लव्ह जिहाद वर बंदी आणून सरकार ने त्याच्यावर लवकरात लवकर कायदा करावा – प्रसाद लाड 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी येथे दिली भेट 
खंडाळ्यात आढळले दुर्मीळ वाघाटी रानमांजर

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निधी आणला आहे म्हणून प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे विरोध करून  सभा पुढे ढकलण्याचे षडयंत्र  शिवसेना व विकास आघाडी करीत असल्याचा  आरोप आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

         डांगे म्हणाले ,”  विकास कामांना जाणून-बुजून विरोध केला जात आहे. ३१ मार्चला आर्थिक वर्ष संपते म्हणून आजच्या नगरपालिकेच्या विशेष सभेची खिल्ली उडवण्याचा उद्योग विकास आघाडी केला.”
       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी इस्लामपुरात पत्रकार बैठकीत विकास आघाडीच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते संजय कोरे,उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील, आरोग्य सभापती विश्वनाथ डांगे, बांधकाम सभापती सुनिता सपकाळ, नगरसेवक खंडेराव जाधव,संगीता कांबळे, माजी नगरसेवक सदानंद पाटील उपस्थित होते.
      विश्वनाथ डांगे म्हणाले,” काहीतरी खुसपट काढून विकासकामांना खो घालण्याचा प्रयत्न इस्लामपुरात विकास आघाडी व शिवसेना करीत आहेत. त्यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विकास कामे सुरू ठेवू.”
      डांगे म्हणाले,” जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागातील विकास कामांचा समावेश विशेष सभेच्या विषय पत्रिकेवर होता. २८ जानेवारी पासून याचा पाठपुरावा आम्ही करत होतो. वारंवार या विषयासंदर्भातची बैठक होणार कशी नाही ? याकडे विकास आघाडी व नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. संबंधित विषयाची मीटिंग घेण्यासाठी टाळाटाळ केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या  अद्यादेशाचा चुकीचा अर्थ लावत आजची सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. शहरातील सुमारे १४ कोटी रुपयांच्या विकासकामांचा संदर्भ सभेला असताना लवकरात लवकर या विषयांना मंजुरी हवी होती.  जाणीवपूर्वक वेळेचा अपव्यय करण्यात आला.”
        गटनेते संजय कोरे म्हणाले,” विषय पत्रिकेवरील विषय कायद्याच्या तरतुदीप्रमाणे  घेतले नाहीत. ही मुद्रित चूक असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक विषय पत्रिका काढताना पीठासीन अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे  आहे. तसे न करता चुकीच्या पद्धतीने विषय पत्रिका काढण्यात आली होती. २०-मार्च  रोजी सभा सुरू करण्यापूर्वी सभेचे चित्रीकरण हवे असे पत्र दिल्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. वास्तविक या सभेचे कामकाज सुरू ठेवावे यासाठी आम्ही मागणी केली पण ती जाणीवपूर्वक नगराध्यक्ष पाटील यांनी फेटाळली.”
 शहाजी पाटील म्हणाले,” वारंवार सभा पुढे ढकलून विकासाच्या आड कोण येते हे नागरिकांनी ओळखले आहे. आजचा दिवस शहराच्या इतिहासात काळाकुट्ट दिवस आहे.”

 चौकट  वैभव पवारांचे आरोप बालिश….
विकासकामांचा निधी अजित पवारांनी दिल्याचा आरोप बालिश असल्याची टीका डांगेनी केली. अजितदादा अर्थमंत्री आहेत. निधी शासनाचा आहे. त्यावर सही अजितदादा करणार नाहीत, तर कोण करणार? उगीच आरोप करायचा म्हणून बालिश विधाने करू नयेत. सव्वाशे कोटी आणल्याचा डांगोरा पिटला, त्यातील नियमित अनुदान सोडल्यास एक रुपयाही आणला नाही, असे ते म्हणाले.

COMMENTS