Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 माथाडी कायदा बचावासाठी मार्केटयार्ड बंद

पुणे : माथाडी कायदा बचावासाठी गुरुवारी मार्केटयार्ड बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. भाजीपाला बाजार बंद असल्याची माहिती अन

घरफोडी करणार्‍या दोन महिलांना अटक
जावळीच्या तहसीलदारांनी मालदेव घाटातील वणवा कर्मचार्‍यांसोबत विझवला
कालीचरणला खजुराहो येथून अटक l DAINIK LOKMNTHAN

पुणे : माथाडी कायदा बचावासाठी गुरुवारी मार्केटयार्ड बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. भाजीपाला बाजार बंद असल्याची माहिती अनेक शेतकर्‍यांना नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन , तोलणार, टेम्पो चालक-मालक संघटनेसह विविध संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. मार्केट यार्डमधील भाजीपाला बाजार बंद असल्याने बंद असल्याची माहिती अनेक शेतकर्‍यांना नव्हती. त्यामुळे शेतीमाल विक्रीस पाठवणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाले. माथाडी कायदा बचावासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता. राज्यव्यापी बंद स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुण्यातील संघटनांनी बंद पुकारण्याचा निर्णय कायम ठेवला.

COMMENTS