Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून तुंबळ हाणामारी

सात जण जखमी सहा जणांविरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथर्डी ः तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळातील दोन गटाचे अध्यक्षपदाच्या वादाचे रूपांतर गुरुवारी सका

लेकीसह आई-वडिलांचा अपघातात मृत्यू | LOKNews24
आमदार काळेंनी उपोषणाला भेट देत दिला पाठिंबा
खंडाळा येथे आज कविसंमेलन

पाथर्डी ः तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळातील दोन गटाचे अध्यक्षपदाच्या वादाचे रूपांतर गुरुवारी सकाळी तुंबळ हाणामारीत झाले दरम्यान यामध्ये सात जण जखमी झाले आहेत असून पाथर्डी पोलिस ठाण्यात विश्‍वस्त शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसर्‍या गटाचे संजय मरकड झालेल्या मारहाणीत डोक्याला मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.सायंकाळपर्यत दुसर्‍या गटाची तक्रार दाखल नसल्याने त्यांचा अधिकृत मजकूर समजू शकला नाही.
        याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी देवस्थानच्या नवीन अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार होती. या बैठकीसाठी गुरुवारी सकाळी विश्‍वस्त आले होते मात्र एका गटाने मिटिंग हॉल ला कुलूप लावत मिटिंग होणार नाही असा पवित्रा घेतल्याने संजय मरकड व शिवजीत डोके यांच्यात शाब्दिक वादाला सुरवात होऊन वाद विकोपाला जात दोन्हीही गटात हाणामारी लाठ्या, काठ्या, गज, पाईपाने हाणामारी झाली. या हाणामारीत संजय मरकड,शिवजीत डोके यांच्यासह संकेत मरकड, प्रतीक काळदाते, सुनील निमसे, अक्षय कुटे, प्रसाद डोके हे जखमी झाले. त्यांच्यावर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पाथर्डी पोलीस स्टेशनला व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती.या मारहाणीप्रकरणी शिवजीत डोके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय मरकड, संकेत मरकड, दत्ता मरकड, अक्षय कुटे, बाळासाहेब मरकड, प्रतीक काळदाते व इतर दहा ते पंधरा अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीचा हा प्रकार कानिफनाथांची समाधी असलेल्या मुख्य गडावर घडल्याने या ठिकाणी आलेल्या भाविकांची पळापळ झाली तर या घटनेची माहिती कळताच मढी च्या ग्रामस्थांनी गडाकडे धाव घेतली. मढी देवस्थानचे अध्यक्षपद हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून कळीचा मुद्दा बनला असून हा वाद न्यायालयात सुद्धा गेला होता.या प्रकरणामुळे मात्र कानिफनाथांच्या भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

COMMENTS