युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : एकतर्फी प्रेम करणार्‍या युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. व

सिव्हिल हडको येथील घरफोडीत दागिन्यांची चोरी
वैष्णवी चौकात रविवारी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
आदिती गंभीरेचे सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश

अहमदनगर/प्रतिनिधी : एकतर्फी प्रेम करणार्‍या युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शीतल स्वामी चव्हाण (वय 26, रा. घोसपुरी, ता. नगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणारा युवक अभिमन्यू शिवराम भोसले (वय अंदाजे 23, रा. देऊळगाव सिध्दी, ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, शीतल ही मूळची गुंडेगाव येथील असून घोसपुरी हे तिचे सासर आहे. घटना घडली त्यावेळी शीतल माहेरी वडिलाकडे आलेली होती. अभिमन्यू हा शीतलला म्हणाला, तू मला आवडतेस व मी तुला पसंत करतो. तू तुझ्या नवर्‍याला सोडचिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवून घेऊन जाईन, अशी धमकी दिली. शीतलने अभिमन्यूला समजावून सांगितले; पण अभिमन्यू तिच्या प्रेमात वेडा झाला होता, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अभिमन्यूचा त्रास असाह्य झाल्याने शीतलने स्वतःला पेटवून घेतले. यामध्ये शीतल जास्त भाजली होती. तिला उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ससून हॉस्पिटल गाठले. शीतलचा जबाब नोंदविला. यावेळी सर्व घटनाक्रम समोर आला. मात्र, उपचारादरम्यान शीतलचा मृत्यू झाला. पोलिसांनी अभिमन्यू भोसलेविरोधात गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले. दरम्यान, शीतलच्या आत्महत्येच्या घटनेने गुंडेगाव व घोसपुरी येथे खळबळ उडाली आहे.

COMMENTS