येत्या २४ नोव्हेंबरला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातल्या गाण्यांची जोरदार चर्चा होतान
येत्या २४ नोव्हेंबरला हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातल्या गाण्यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ‘मराठी पोरी’ हे गाणं रिलीज झालं होतं. गाणं रिलीज होताच अवघ्या काही क्षणातच गाण्याची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. या गाण्याची फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही क्रेझ पाहायला मिळत आहे. सध्या कॅनडामध्ये शूट केलेल्या एका महिलेच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले. त्या महिलेने कॅनडामध्ये – 2°C वातावरणात साडी नेसून रील शूट केला आहे. सोशल मीडियावर बरेच सेलिब्रिटीही ‘मराठी पोरी’ या गाण्यावर रिल बनवत शेअर करताना दिसत आहे. सर्वच सेलिब्रिटींसह अनुष्का धुमाळ या फॅनने देखील शेअर केलेल्या रिलने सर्वांचेच लक्ष वेधले. तिने रिल करताना, मराठमोळा लूक केला आहे. हिरव्या रंगाची साडी, सोनेरी रंगाचा ब्लाऊज आणि नकात नथ घालून तिने ही रिल शूट केली आहे.’मराठी पोरी In Canada कॅनडाच्या -2°C मधेही, ‘मराठी पोरी’ नाचते आज. ‘झिम्मा २’च्या टीमला खूप खूप शुभेच्छा. क्षिती जोग, हेमंत ढोमे सह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला कॅनडाहून खूप खूप प्रेम… अशा आशयाचे कॅप्शन देत तिने ‘मराठी पोरी’चा रिल शेअर केला आहे. अगदी गाण्यामध्ये ज्या प्रमाणे हूक स्टेप्स केल्या आहेत. तशाच हूकस्टेप्स त्या मुलीने सुद्धा केल्या आहेत. या शेअर केलेल्या व्हिडीओला २५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाईक्सचा वर्षाव चाहत्यांनी केला आहे.
COMMENTS