Homeताज्या बातम्यादेश

बेळगाव महापालिकेत मराठी महापौर

कन्नड संघटनांचा दबाव झुगारून भाजपची खेळी

बेळगाव/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संघर्ष सुरू असतांनाच, बेळगाव महापालिकेवर मराठी झेंडा फडकवण्यात भाजपला यश मिळाले आहे. महापौरपदा

पुण्यात बेकायदेशीर इंधनविक्रीचे रॅकेट उघडकीस
अजून किती शेतकर्‍यांचे मुडदे पाडणार ? : राजू शेट्टींचा सरकारला खडा सवाल
आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या टेम्पोचा झाला अपघात

बेळगाव/प्रतिनिधी ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून संघर्ष सुरू असतांनाच, बेळगाव महापालिकेवर मराठी झेंडा फडकवण्यात भाजपला यश मिळाले आहे. महापौरपदावर मराठी नगरसेविका शोभा सोमना तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने कन्नड उमेदवारांना डावलून मराठी माणसाला या पदावर बसवल्याने मराठी मतांना साद घातली आहे.

कर्नाटकात आगामी काही महिन्यानंतर विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीमध्ये बेळगाव, कारवार, निपाणी भागामध्ये मराठी मतदार मोठया प्रमाणावर आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र-कानडी वाद गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपने ही खेळी करत, मराठी मतदारांना खून करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड संघटनांच्या दबावाला झुगारून भाजप नेत्यांनी दोन्ही मराठा समाजातील उमेदवारांना प्राधान्य देत पुन्हा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे कन्नडिगांचा हिरमोड झाला आहे. महापालिका सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे असून पदसिद्ध 7 सदस्यांपैकी 5 सदस्य त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 40 आहे. सत्तारूढ गट नेते पदी लिंगायत समाजातील राजू डोणी यांची भाजप कोअर कमिटीने निवड केली असल्याचे समोर येत आहे. बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर मिळाला आहे. महापौरपद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव होते. महापौर- उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील मराठा नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहूनगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांनी सकाळीच नामांकन दाखल केले होते. तर महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.

COMMENTS