मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथुन मुंबईपर्यंतचा मराठा
मुंबई ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असून, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथुन मुंबईपर्यंतचा मराठा दिंडी निघणार आहे. या दिंडीचा मार्ग गुरूवारी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले, 20 जानेवारीला सकाळी 9 अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्यांनी या पायी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, आपण शांततेच्या मार्गाने मुंबईत जाणार आहोत. आरक्षण मिळवले नाहीतर, मराठ्यांच्या मुलांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे कुणीही घरी बसू नये. घरी राहिलो, तर आपल्या मुलांचे वाटोळ होईल. ही शेवटची लढाई आपल्याला जिंकायची आहे. आरक्षण मिळवल्याशिवाय माघारी यायचे नाही, असा निर्धार ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 20 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावातून जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने ‘मराठा आरक्षण दिंडी’ कूच करणार असून उपोषणात सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठा कार्यकर्ते मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. मुंबईत उपोषणाला बसण्यासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्क किंवा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानापैकी एक ठिकाण येत्या एक दोन दिवसांत निश्चित केले जाईल अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली. 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ’मराठा आरक्षण दिंडी’ अंतरवली सराटी गावातून निघून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. बीडमधून जालना, शहागड, गेवराई, अहमदनगर, शिरुर आणि शिक्रापूर मार्गे रांजणगाव, खराडी मार्गे पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहचणार आहे. पुणे मुक्कामानंतर लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर मार्गे मुंबईत पोहचणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. मुंबईत जरांगे यांच्या उपोषणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ठिकाण निश्चित करण्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आली असून कमिटीचे सदस्य येत्या एक, दोन दिवसांत मुंबईत येऊन या तिन्ही मैदानांना भेट देऊन एक ठिकाण निश्चित करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
असा असेल मार्ग ? – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून सुरूवात होणार असून, यानंतर बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी, खरवंडी, यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, तीसगाव, करंजी घाट, अहमदनगर, केडगाव, येथुन पुढे पुणे जिल्ह्यातील सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजगणाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे-मुंबई एक्स्प्रेसमार्गे लोणावळा मार्गे पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान पोहचणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
COMMENTS