Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आंदोलनाला हिंसक वळण

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक

बीड ः राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दयाने हिंसक वळण घेतले असून, अनेक ठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होतांना दिसून येत आहे. काही ठिकाणी आंदोलनाला

बियाणींच्या हत्येची गृहमंत्र्यांनी घेतली दखल
अरमान मलिक 5व्यांदा होणार आहे बाबा
 मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही  – शर्मिला ठाकरे

बीड ः राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दयाने हिंसक वळण घेतले असून, अनेक ठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होतांना दिसून येत आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक रूप प्राप्त झाले आहे. आंदोलकांनी पुढार्‍यांना गावबंदी केली असून राष्ट्रवादी कॉँग्रेसगटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर तूफान दगडफेक केली आहे. जवळपास तासभर आंदोलक त्यांच्या घरावर दगडफेक करत होते. दरम्यान, काहींनी जाळपोळ देखील केल्याने त्यांच्या घरातून आगीचे लोट निघत होते. त्यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुढार्‍यांना गावबंदी केली आहे. त्यात, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने सोमवारी संतप्त आंदोलकांनी साळुंखे यांच्या माजलगाव येथील घरासमोर जमा होत तुफान दगडफेक केली. तब्बल एका तासापासून दगडफेक करण्यात आली. तर काही आंदोलकांनी जाळपोळ देखील केली. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यामधून धुराचे लोळ येत होते. या बाबत आमदार प्रकाश सोळंकें म्हणाले की, मी माझ्या माजलगाव येथील घरात असतांना सकाळी आंदोलकांनी घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात घराचे, ऑफिसचे व गाड्यांचे नुकसान झाले. मी मराठा समाजाचाच आमदार असून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. काही राजकीय विरोधक माझ्या बद्दल अफवा पसरवत आहे. काहीजण अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांना माझी विनंती आहे, की तुमच्या प्रेमाच्या जोरावर मी आमदार झालो असून मराठा समाजाच्या अरक्षणाला माझा पाठिंबा असल्याचे आमदार सोळंके म्हणाले आहेत.

COMMENTS