Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद मध्ये विहिरीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

 औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बह

जालना जिल्ह्यात 102 चे 28 रुग्णवाहिका दाखल l पहा LokNews24
शिवसेनेकडून महागाईच्या मुद्द्यावरून मोर्चाचे आयोजन… | LOKNews24
आरक्षण आंदोलनाचा एसटीला फटका

 औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह घराजवळील विहिरीत आढळले आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील चिखलठाण येथून बेपत्ता झालेल्या दोन सख्ख्या बहिणी मागील 3 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. आज सकाळी दोघींचे मृतदेह हे घराजवळील विहिरीतील पाण्यावर तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दत्तू बाबुराव चव्हाण हे शेतात राहतात. त्यांच्या दोन मुली स्वाती दत्तू चव्हाण (19) आणि शितल दत्तू चव्हाण (15) या बेपत्ता असल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

COMMENTS