नवी दिल्ली : विविध खेळांमध्ये उत्कृृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय

नवी दिल्ली : विविध खेळांमध्ये उत्कृृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंचा शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते डबल ऑलिंपिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, दोन वेळेचा ऑलिंपिक पदक विजेता आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर महाराष्ट्रातील नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय पुरुष हॉकी खेळाडू जरमनप्रीत सिंग, संजय, अभिषेक आणि सुखजीत सिंग आणि महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
COMMENTS