Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको

24 फेबु्रवारीपासून गावोगावी तर 3 मार्चला एकाच वेळी आंदोलन

जालना ः मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले असले तरी, मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षण हवे

समाजाशी दगाफटका केल्यास जड जाईल
मनोज जरांगे पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

जालना ः मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाले असले तरी, मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षण हवे, या मागणीवर ठाम आहेत. यासोबतच सरकारने सगेसोयर्‍याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, येत्या 24 फेबु्र्रवारीपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे म्हणाले की, उद्यापासून मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी निवेदन द्यावे, 24 तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी 4 ते 7 रास्तो रोको करायचा. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कालचे आरक्षण आपल्या आंदोलनामुळेच मिळालेले आहे. परंतु ते आरक्षण आम्हाला नको आहे. देशतली ही पहिली घटना आहे गरीबांनी श्रीमंतांना आरक्षण दिले. ज्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होते, त्यांना मिळाले आहे. तेही आरक्षण रद्द झाले तर मराठ्यांच्या तरुणांचे सात वर्षांचे नुकसान होईल. अशी भीती जरांगेंनी बोलून दाखवली. यावेळी मनोज जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांचा देखील चांगलाच समाचार घेतला. सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही आणि तिकडे तो येवल्याचा नेता वाट्टेल ते बडबडतोय. तो म्हणे मनोज जरांगे गोधडी पांघरून आत मोबाईलमध्ये काय बघतो ते माहिती आहे. अरे, तुला काय माहिती मी आत काय बघतो. मो गोधडीत मोबाईलमध्ये काय बघतोय हे त्याला कोण सांगतंय ते मला माहिती आहे. मी त्याला शोधून काढलंय. हा घातपाताचा प्रकार आहे. आमचंच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो. मी त्याला एवढेच सांगेन की त्याने असे काही करू नये. आंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळावरील माहिती कोणीतरी छगन भुजबळांना देत आहे असा दावा करत मनोज जरांगे म्हणाले, येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलंय. पण मी त्या गद्दाराला सांगेन की, मराठ्यांशी बेईमानी करू नको. मी आत्ता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतोय. रोज आमच्याबरोबर उठतो-बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतीष्ठा मिळाली याचा विसर पडू देऊ नको, असा इशारा जरागेंनी दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या – कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावे. सगेसोयर्‍यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा. अन्यथा हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी-मराठा एकच असल्यचा निर्णय जाहीर करा. एका ओळीचा आदेश काढून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करावा. तसेच अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ द्या अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत

COMMENTS