Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जातेगाव फाटा खर्डा येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगेंचे क्रेनच्या साह्याने हार घालून मोठे जं

मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश
आमचा बोलवता धनी मराठा समाज मनोज जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जातेगाव फाटा खर्डा येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगेंचे क्रेनच्या साह्याने हार घालून मोठे जंगी स्वागत समस्त मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. मनोज जरांगे यांची जामखेड येथे महासभा आयोजित केली होती. या सभेसाठी जात असताना खर्डा वाशियांनी जातेगाव फाटा येथे स्वागत केले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍नावर अंतरवली सराटी गावापासून महाराष्ट्रभर रान पेटवले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग गावागावात, घराघरात पोहोचली आहे. 40 दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जावून सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. 14 ऑक्टोंबर रोजी मराठा समाजाची संवाद सभा अंतरवली सराटी येथे शंभर एकर जागेमध्ये होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपर्‍यात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी  जामखेडला सभेस येण्यापूर्वी श्री क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. यावेळी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी माजी सभापती डॉ भगवान मुरुमकर, अमित चिंतामणी अजय काशिद, शरद कार्ले, प्रा सचिन गायवळ, सोमनाथ पाचरणे, रविंद्र सुरवसे, तुषार पवार, बाजार डॉ गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, लहू शिंदे, पांडुरंग उबाळे, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, ड प्रविण सानप, गणेश लटके, उदय पवार, उध्दव हुलगुंडे आदी उपस्थित होते.

COMMENTS