HomeUncategorized

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे फार्मा तिर्थाटन !

भारतासारख्या विकसनशील देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे महत्व अनन्य आहे.सार्वजनिक आरोग्य सुविधा ताळागाळापर्यंत नेऊन आरोग्यवर्धीत भारताच्या निर्माणात मोलाचे

भारतीय संविधान सक्षम : प्राचार्य बाळ कांबळे
भारताच्या अडचणी वाढल्या ; ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

भारतासारख्या विकसनशील देशाच्या आरोग्य मंत्रालयाचे महत्व अनन्य आहे.सार्वजनिक आरोग्य सुविधा ताळागाळापर्यंत नेऊन आरोग्यवर्धीत भारताच्या निर्माणात मोलाचे योगदान देऊ शकणाऱ्या या मंत्रांलयाला चंद्रशेखर,पी,व्हि.नरसिंहराव ,मोराराजी देसाई या पंतप्रधान पदापर्यंत पोहचलेल्या व्यक्तींच्या योगदानाची परंपरा आहे.अशा मंत्रालयाचा पदभार गुजरातचे भुमीपुञ मनसुख मंडविया यांच्याकडे सोपविण्यात नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन काय असेल? फार्मा कंपन्याचे वारंवार तिर्थाटन या पात्रतेशिवाय  वगळता हर्षवर्धन यांच्या तुलनेत मोदींना मनसुख यांच्यात कुठले गुण आढळले? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॕ.भारती पवार यांना कर्तृत्व दाखविण्यासाठी  किती आणि कसा स्पेस मिळणार? यासारखे मुद्दे आता चर्चेत येऊ लागले आहेत.सोबतच गृहमंत्रालयातही निशिध प्रामाणिक यांच्या माध्यमातून अमित शहा यांना परफेक्ट सहकारी लाभल्याचे बोलले जात आहे……*लिड*
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या फेरबदलात नव्याने संधी मिळालेल्या चेहऱ्यांचे सामाजिक आॕडीट करण्याचे काम आता काही मंडळींनी हाती घेतले.या विस्तारीत फेरबदलात कुणाला कशी संधी मिळाली? कुणाला डावलले गेले? यामागची राजकीय सामाजिक रणनिती काय होती? त्याचा संभाव्य राजकारण आणि समाजकारणावर काय परिणाम होऊ शकतो यावरही बरेच मंथन झाले,त्यानंतर आता मोदी यांनी नव्याने संधी दिलेल्या मंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबद भविष्य वर्तविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.एखाद्या मंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबद भविष्य वर्तविण्यासाठी त्याच्या आजपर्यंतच्या यशापयशाची अथवा कार्यपध्दतीची,शैक्षणिक पात्रतेची आणि सामाजिक गुणांची चर्चा अनिवार्य ठरते.त्या खात्याशी संबंधीत पुर्वीच्या मंत्रांशीही नव्या मंत्र्यांची तुलना केली जाते,मोदी सरकारमध्ये नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांचेही असे आॕडीट सुरू झाले असून यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मंडविया आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री निशिध प्रामाणिक यांची नावे आघाडीवर आहेत.या अनुषंगाने गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य राज्य मंत्री डाॕ.पवार यांच्यासोबत मावळते आरोग्यमंत्री डाॕ.हर्षवर्धन हेही चर्चेत आले आहेत.
मंत्रीमंडळाचा विस्तार करतांना काही जुन्या मंत्र्यांना मोदींनी डच्चू दिला.मंत्री म्हणून चमक दाखवता आली नाही.असा ठपका ठेवून या मंत्र्यांना डच्चू देऊन घरी बसवण्यात आले असे सांगीतले जात असले तरी एव्हढे एकच कारण नाही हे हर्षवर्धन आणि मनसुख मंडविया यांच्यात होत असलेल्या तुलनेवरून स्पष्ट होऊ लागले आहे.हर्षवर्धन यांना हटवून मनसुख यांना मोदींनी संधी का दिली यावर भाष्य करतांना अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो आहे.मुळात हर्षवर्धन हे स्वतः भारतातील नामांकीत कान नाक घसा तज्ञांपैकी एक पदव्युत्तर सर्जन आहेत.संघ परिवाराशी अंत्यत प्रामाणिक निकटवर्तीय म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांची कारकिर्द प्रचंड यशस्वी ठरली आहे.१९९३ मध्ये दिल्लीचे आरोग्यमंत्री असतांना हर्षवर्धन यांनीच सर्वप्रथम पोलीओ डोसचा पायलट प्रोजेक्ट राबवला.त्यातून प्रेरणा घेत युनिसेफने या प्रोजेक्टला निधी उपलब्ध करून देत राष्ट्रीय प्रोजेक्ट म्हणून अंमलात आणण्यास प्रोत्साहन दिले. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी आणि १८ वर्षाखालील व्यक्तीला बिडी सिगारेट विक्री करण्यास प्रतिबंध आणणारा कायदा ही हर्षवर्धन यांची भारताला देणगी आहे.दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणून यशस्वी कारकिर्द राहीली म्हणून मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना आरोग्यमंत्रालयाचा कार्यभार सोपवला गेला.तथापी अवघ्या सहा महिन्यात मोदींचे विश्वासू सहकारी जे.पी.नड्डा यांना आरोग्यमंत्रालय दिले गेले.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पुन्हा हर्षवर्धन यांना आरोग्यमंत्री म्हणून संधी दिली गेली. कोरोना महामारीतही रूग्णालय पातळीवर उपचार व्यवस्था चोख ठेवण्यासाठी हर्षवर्धन यांनी जातीने लक्ष घातले.तरीही हर्षवर्धन यांना बाहेर काढून मनसूख मंडविया यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी का दिली? असा कळीचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे.मनसुख यांच्यात हर्षवर्धन यांच्या तुलनेत कुठली सरस पात्रता मोदींना भावली असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातो आहे.शैक्षणिक पात्रता आणि मिळालेले मंत्रालय याचा अर्थाअर्थी कुठलाही संबंध निदान भारतीय लोकशाहीला मान्य नाही.इतिहासानेही हे सिध्द केले आहे,चौथी सातवी पास असलेल्या नेतेमंडळींनीही आपले कर्तृत्व सिध्द करून संबंधीत संबंधीत मंत्रालयाचा सन्मान वाढवला आहे,शिक्षणाचा संबंध नसला तरी मनसूख मंडाविया हे राज्यशास्राचे मास्टर आहेत याचा वारंवार उल्लेख होता,यातून त्यांचा वैद्यकीय शास्राशी संबंध नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आरोग्य मंत्रालयाचा कारभार सांभाळण्यापुर्वी त्यांच्याकडे रासायनिक खते या मंत्रालयाचा कार्यभार होता.तत्पूर्वी ते गुजरात कृषी बोर्डाचे चेअरमन होते,वयाच्या२१ व्या वर्षी गुजरात अभाविपचे ताकदवार नेता म्हणून ओळखले जात होते.मोदींचे अत्यंत विश्वासू म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात त्यांना भारताचे प्रतिनिधी म्हणून अजेंडा २०३० वर बोलण्याची संधीही मिळाली आहे.खरी पात्रता ही नाही तर आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्यापुर्वी रासायनिक खते हा विभाग सांभाळतांना आरोग्य मंत्रालयाशी संबंधीत मोदींनी टाकलेली जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली.जे काम हर्षवर्धन यांचे होते ते काम मनसूख यांनी केले ते त्यांच्यात असलेल्या बार्गेनिंग पाॕवर ,डिलींग आणि त्या अनुषंगाने हवी असलेली मॕनेजमेंट या उपजत गुणांमुळे.हेच गुण जे हर्षवर्धन दाखवू शकले नाहीत,मनसूख यांना मोदींचा विश्वास कमावण्यास कारणीभूत ठरले आहेत.कुठलाही मंत्री वारंवार खासगी उद्योगांच्या तिर्थाटनात व्यस्त राहू नये.खरे तर हा प्रोटोकाॕल मनसूख यांनी केंव्हाच पायाखाली चेंगारला.कार्यभार रासायनिक खते मंत्रालयाचा असतांना ते वारंवार खासगी ओषध कंपन्यासह लस तयार करणाऱ्या खासगी उद्योगांना भेटी देत होते.भारत बायोटेक,सिरम,सिपला कॕडीला यासारख्या असंख्य कंपन्यांना मनसूख यांनी दिलेल्या भेटी त्यांनी आरोग्य मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर चर्चेत आल्या आहेत.मोदी आणि मनसूख यांच्यात असलेले जिव्हाळ्याचे संबंध ,गेल्या काही दिवसात त्यांनी जपलेले,संवर्धित केलेले फार्मा कनेक्शन आणि त्यांना मिळालेले आरोग्य मंत्रालय हा निव्वळ योगायोग मानला जात नाही.यामागे मनसूख यांच्याकडे असलेल्या डिलींग आणि बार्गेनिंग पाॕवरचा करिश्मा लपलेला असल्याची वंदता आहे.हर्षवर्धन यांचा तो पिंड नव्हता.डिलींग तर दुरदुरपर्यंत त्यांना मान्य नव्हते.कदाचित याच अवगुणामुळे त्यांना पदभार सोडावा लागला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.हर्षवर्धन यांनी रूग्णालय पातळीवर भारतीयांना आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत म्हणून केलेले प्रयत्न वादातीत आहेत.डच्चू मिळावा इथपर्यंत हर्षवर्धन यांची कामगीरी कमकुवत नक्कीच नव्हती.आरोग्य मंत्रालयाच्या कामगीरीबद्दल पहिल्याच पत्रकार परिषदेत नवे आरोग्यमंत्री मनसूख यांनी केलेले कौतूक हर्षवर्धन यांच्या कार्यक्षमतेचा गौरव करणारेच आहे.मात्र हा काळ रूग्णालयाची उपचार सुधरविण्याचा नाही तर औषधे खरेदी,वैद्यकीय उपकरणे,व्हेंटीलेटर खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली डिलींग,बार्गेनिंग  पाॕवर सिध्द करण्याचा आहे हे हर्षवर्धन यांच्या लक्षात आले नाही किंबहूना तो त्यांचा पिंड नाही,ज्यावर मनसूख यांनी मात केली.
मनसूख आरोग्याशी अथवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत नसले तरी मोदी यांनी चलाखीने वैद्यकीय क्षेत्रात हातखंडा असलेल्या डाॕ.भारती पवार यांना मनसूख यांच्या दिमतीला दिले आहे.भारती पवार यांची हातोटी पहाता मनसूख यांच्यात असलेली उणिव त्या नक्कीच भरून काढतील,याचाच अर्थ प्रत्यक्षात फिल्डवर्क करण्याची जबाबदारी भारती पवार यांच्या खांद्यावर टाकली आहे,या जबाबदारीत त्या यशस्वी होतील.मात्र श्रेय कॕबीनेटला जाणार हे नक्की.गृहराज्य मंत्रालयही अशाच पात्रतेसंदर्भात चर्चेत आले आहे,सध्या गृहमंत्रालयाचा कारभार अमित शाह यांच्याकडे आहे.अमित शाह यांच्यावर त्यांच्या पुर्वाश्रमीच्या कर्तृत्वामूळे विरोधक आजही टिका करतांना दिसतात.तडीपार गृहमंत्री म्हणून त्यांची हेटाळणी होत असतांना त्यांच्याच मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नव्याने शपथ घेतलेले प.बंगालचे खासदार निशिध प्रामाणिक यांनाही घेरले जात आहे,सर्वात तरूण मंत्री म्हणून चर्चेत असलेले प्रामाणिक त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे चर्चेत आहेत.गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमुद आहे.खुनाचा प्रयत्न करणे,महिला उत्पीडन,जमीन बळकावणे असे गंभीर गुन्हे प्रलंबीत असलेल्या व्यक्तीवर गृह राज्य मंत्रालयाचा पदभार सोपविल्याने  गृहमंत्रालयाला वेगळ्या उंचीवर नेणारे  सरदर वल्लभभाई पटेल यांची आठवण होऊ लागली आहे.आरोग्य मंत्रालय असो नाही तर आरोग्य मंत्रालय भारत बदलतो आहे हे मात्र नक्की.

COMMENTS