नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसकडून भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येणार असून, या यात्रेची सुरूवात मणिपूर राज्यातून करण्

नवी दिल्ली ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसकडून भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येणार असून, या यात्रेची सुरूवात मणिपूर राज्यातून करण्यात येणार होती. मात्र या यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारल्यामुळे काँगे्रससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
प्रदेश काँग्रेसचे प्रमुख केशम मेघचंद्र यांनी बुधवारी मणिपुरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांची भेट घेतली आणि त्यांना या यात्रेला परवानगी देण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले नाही. केशम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकले नाही. यापूर्वी, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मंगळवारी (9 जानेवारी) सांगितले होते की काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला परवानगी देण्याचा सक्रियपणे विचार केला जात आहे. सुरक्षा यंत्रणांचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तेव्हा वेणुगोपाल म्हणाले होते की, ही राजकीय यात्रा नाही, त्यामुळे सरकारने याचे राजकारण करू नये. संकटग्रस्त मणिपूरमधील लोकांच्या जखमा भरून काढणे आणि द्वेष संपवून प्रेमाचा संदेश देणे हा यात्रेचा उद्देश आहे. दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि केसी वेणुगोपाल यांनी या यात्रेचा रोड मॅप आणि पॅम्प्लेट जारी केले. काँग्रेस खासदार राहुल गांधी 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा सुरू करणार आहेत. ही यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन 20 मार्चला मुंबईत संपेल. लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 4 महिने आधी निघणार्या या यात्रेत 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांचा समावेश असेल. या काळात राहुल पायी आणि बसने 6 हजार 200 किलोमीटरहून अधिक अंतर कापतील. ती मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि महाराष्ट्रात संपेल.
COMMENTS