Homeताज्या बातम्यासंपादकीय

मंगेशकर हाॅस्पिटल जीवघेणे ठरले !

पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलने पैशांच्या हव्यासापोटी एका तरूण मातेचा प्राण घेतला, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरला नाही; एवढा बेजबाबदारपणा

आरक्षणधारी आणि आरक्षण मागणारी शक्ती एकत्र येण्याची गरज! 
युत्या खुशाल कराव्या, पण, विचारांचे भान राखून !
संचित धनाचा निचरा होण्यासाठी डिजिटल चलन !

पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलने पैशांच्या हव्यासापोटी एका तरूण मातेचा प्राण घेतला, असं म्हणण्याशिवाय गत्यंतर उरला नाही; एवढा बेजबाबदारपणा हाॅस्पिटल प्रशासनाने दाखवला आहे. हा केवळ बेजबाबदारपणा म्हणून चालणार नाही; तर, अशा प्रकारची प्रवृत्ती नव्या व्यवस्थेत उभ्या राहिलेल्या खाजगी हास्पिलची ती रणनीती आहे. त्यामुळे, याविरोधात केवळ तात्कालिक आंदोलन करणे एवढाच यावर उपाय असू शकत नाही! मुळातच, देशातील गेल्या पाच वर्षाची आकडेवारी पाहिली तर, कृत्रिमरीत्या मातृत्व देण्याची प्रवृत्ती देशात वाढीस लागली आहे. मातृत्व नैसर्गिक असताना अनेक हाॅस्पिटल्स केवळ माल प्रॅक्टिस करण्यासाठी सिझेरीन सारखा प्रकार करतात, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने काही वर्षापूर्वी दिला आहे. २०१९ ला १७.५ टक्के असणारे हे प्रमाण २०२३-२४ ला २३.६ टक्के एवढे झाले आहे. यासंदर्भात निरिक्षण नोंदविताना अनेक प्रकारच्या अहवालांनी हे स्पष्ट म्हटले आहे की, भारतात खाजगी हाॅस्पिटल्सनी यात आघाडी घेतली आहे. सरकारी हाॅस्पिटल्सच्या तुलनेने खाजगी मध्ये याचे प्रमाण ५० टक्के च्या पुढे गेले आहे. जेव्हा की, जागतिक आरोग्य संघटनेने हे प्रमाण कोणत्याही परिस्थितीत १० टक्केच्या पुढे जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु, पुणे येथील मंगेशकर हाॅस्पिटलने या अहवालाला वाचण्याची तसदी घेतलेली नाही. भाजप आमदार अमित गोरे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसुतीदरम्यान तातडीचे उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेवरून पुण्यात सर्व पक्षांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयासमोर आंदोलन केले. आंदोलकांनी चिल्लर फेकली तर, नकली नोटा उधळत रूग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली.तनिषा भिसे या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सदोष मनुष्य वधाची आहे, असा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबतीत पुण्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन नक्कीच समर्थनीय आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटलंय. डॉ घैसास, डॉ केळकर यांचे आणि माझे पीए सुहास भिसेंचे कॉल रेकॉर्ड तपासावेत यातून सर्व सत्य बाहेर येईल, अशी मागणी गोरखेंनी अहवाल पाहिल्यानंतर केली. आता अहवालात किमान दहा लाख रुपये ऍडव्हान्स कबुली रुग्णलयाने दिली, मात्र तनीषा भिसेंना कॅन्सर होता, अशी खोटी शंका रुग्णालयाने उपस्थित केल्याचा दावा ही गोरखेंनी केला. काही महिन्यांपूर्वीच पुण्यातीलच डॉ. पी. टी. गायकवाड यांनी लिहीलेल्या ‘हिप्पोक्रटसच्या नावानं चांगभलं’ या पुस्तकांत वैद्यकीय क्षेत्रात चालणाऱ्या अमानवीय पध्दतीच्या प्रॅक्टीसचा बुरखा टराटरा फाडला आहे. परंतु, सुधारणार ते वैद्यकीय क्षेत्र कसे? मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या व्यवस्थापनाने आमदाराचा आणि मंत्रालयातून आलेल्या फोन काॅल्स ला सुधा जुमानले नाही. एवढा माजोरडापणा या डॉक्टरांना कोणत्या कारणास्तव आला, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. ज्या मंत्रालयातून महाराष्ट्रात कोठेही काॅल लावला तर संबंधितांचा थरकाप होतो. परंतु, मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या व्यवस्थापनावर मात्र, जराही दबाव आला नाही, याचा अर्थ खाजगी क्षेत्रातील काही मंडळी स्वतःला प्रति सरकार समजायला लागले काय, हा देखील चौकशीचा एक मुद्दा असायला हवा. आलेला माजोरडापणा आणि सत्ताकेंद्राला न जुमानण्याची धमक या हाॅस्पिटल्सच्या व्यवस्थापनात आली कशी, हेदेखील स्पष्ट होणे गरजेचे आहे. 

COMMENTS