Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायचिकित्सा विषयात एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा मंगेश तपकीर राज्यात प्रथम

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या चतुर्थ वर्ष बीएएमएस मध्ये शिकत असलेला विद्यार्थी मंगेश तपकीर महाराष्ट्र आरोग्य व

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे : मुख्यमंत्री
वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत

इस्लामपूर / प्रतिनिधी : शहरातील एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या चतुर्थ वर्ष बीएएमएस मध्ये शिकत असलेला विद्यार्थी मंगेश तपकीर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी घेतलेल्या समर 2022 या परिक्षेत कायचिकित्सा या विषयांमध्ये महाराष्ट्र राज्यात पहिला आला. त्याने कायचिकित्सा या विषयांमध्ये 300 पैकी 248 गुण मिळवत महाराष्ट्रात महाविद्यालयाचे नाव आयुर्वेद शिक्षण क्षेत्रात उंचावले आहे. प्रकाश शिक्षण मंडळ संस्थापक व सांगली जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील, अध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन भोसले-पाटील, संचालक संदीप यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मिनकीरे, डॉ. प्रमोद कनप, कायचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. सोनल शहा तसेच सर्व अध्यापक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी मंगेश तपकीर म्हणाला, आयुर्वेदिक महाविद्यालयात मिळालेली ज्ञानाची शिदोरी हीच माझ्या यशामध्ये मोलाची ठरली. मला या महाविद्यालयात प्रवेश मिळाला व मला चांगले अध्यापक व व्यवस्थापन समिती लाभली. हे माझ्या भविष्यातील वाटचालीस खर्‍या अर्थाने आकार देणारी ठरली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व निशिकांत भोसले-पाटील यांनी केलेले कौतुक हे माझ्या पुढील वाटचालीस ऊर्जा देणारे आहे.

COMMENTS