Mandrup : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Mandrup : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते - पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसापासून कासेगाव ते मंद्रुप अशा सहा जिल्हा परिषद

लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात ; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग
धुळेकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी शोले स्टाईल आंदोलन
शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शोधतात नवनवीन मार्ग……. 

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते – पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसापासून कासेगाव ते मंद्रुप अशा सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणासाठी निवडणुकीची रूपरेषा ठरविण्यात आली. निवडणुकीच्या दृष्ठीने काँग्रेस पक्ष सज्ज असून, बुथ रचना कशी असावी , वॉर्ड वाईस नेतृत्व कसे करावे, तसेच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा  उमेदवार कसा निवडून येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते बसवराज बगले, अमृत चव्हाण, मोतीराम राठोड, उमाकांत रावत, श्रीशैल नरोळे, पंडित सातपुते, वसंत पाटील, सैफान शेख, रशीद शेख, रशीद पठाण, राधाकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

COMMENTS