चार वर्षाच्या बालिकेवर नराधमाचा बलात्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार वर्षाच्या बालिकेवर नराधमाचा बलात्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहाता तालुक्यातील जळगाव या गावामध्ये राहणार्‍या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा दहावीचा 94.22 टक्के निकाल
रस्त्यांच्या निधीसाठी संरपचांसह ग्रामस्थांची थेट मंत्रालयात धाव
बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राहाता तालुक्यातील जळगाव या गावामध्ये राहणार्‍या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या (वय 32) या नराधमाने गावातील एका तूर पिकाच्या शेतामध्ये चार वर्षाच्या लहान बालिकेवर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वि.कलम 376 सह अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहे. आरोपींचा शोध घेतला जात असून त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल, अशी माहिती तालुका पोलिसांनी दिली.

COMMENTS