अहमदनगर/प्रतिनिधी : कोणत्याही जीआर वा शासन आदेशाची वाट न बघता शिक्षकांना तन-मन व त्यागाने सहकार्य करावे व भावी पिढीच्या कोविडमुळे झालेल्या नुकसानीचे
अहमदनगर/प्रतिनिधी : कोणत्याही जीआर वा शासन आदेशाची वाट न बघता शिक्षकांना तन-मन व त्यागाने सहकार्य करावे व भावी पिढीच्या कोविडमुळे झालेल्या नुकसानीचे पुनर्भरण करावे असे आवाहन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी येथे केले. मराठी माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी नेता म्हणून जबाबदारी घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे आणि शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी दररोज शाळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी एक तास दिला तर आपल्या हाताने देशसेवा घडेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक विभाग यांच्या पुढाकाराने डॉन बॉस्को विद्यालयात जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच झाले. यावेळी शिक्षण संचालक पालकर यांच्यासह पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे व आकाश दरेकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित उपस्थित होते. यावेळी उकिरडे म्हणाले की, मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी एक तास दिला तर कोरोनामध्ये जो अभ्यास बुडाला तो कव्हर होईल. तसेच गणित, विज्ञान, समाज अभ्यास, मराठी व इंग्रजी विषयांच्या स्पर्धा परीक्षा प्रत्येक महिन्याला एका चाचणी घेऊन प्रज्ञावंत मुले निवडू शकतो तसेच या माध्यमामधून जिल्हयातील 100 शाळा निवडून जिल्हयाची स्पर्धात्मक परीक्षामध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी लोकसेवा हक्क कायदा व माहिती अधिकार कायदा याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांनी मार्गदर्शन केले. पाटील यांनी सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार योजना व शालेय पोषण आहार योजनेच्या ऑडिटबाबत कोणीही घाबरून न जाता वस्तुस्थिती मांडा असे आवाहन केले. प्राचार्य पंडित यांनी प्रास्ताविकात शिक्षकांचे प्रश्न मांडले. यावेळी मुख्याध्यापक संघाच्या ‘ज्ञानकलश’ पुस्तिकेचे प्रकाशन झाले. वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक अधिक्षिका स्वाती हवेले, प्राचार्य भगवानराव खारके, डॉ. पठारे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन वर्षा पाठक, श्रीमती बडे व संगीता कुलकर्णी यांनी केले. सरचिटणीस बाळासाहेब कळसकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जी. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, सुभाष माने, अरुण थोरात, श्रीराम थोरात, बाफनाताई, प्राचार्य फादर जेम्स तुस्कानो, लेखाधिकारी दीपक प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश ढवळे, विनोद लाळगे, प्रशासनाधिकारी बी. टी. थोरात,पर्यवेक्षक पठाण, पालवे, नरवडे उपस्थित होते.
COMMENTS