Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.ज्योतीताई मेटे यांना राज्यपाल नियुक्तीतून आमदार करा-पांडुरंग आवारे पाटील

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी - नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणत्याही पक्षाच्या एकही आमदाराने मराठा आरक्षण असे छत्रपती शिवाजी महाराज

मध्यप्रदेशात कार झाडावर आदळून 5 जणांचा मृत्यू
भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
रेशमबाई पिंगळे यांचे निधन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणत्याही पक्षाच्या एकही आमदाराने मराठा आरक्षण असे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या विषयावर एकही शब्द काढला नाही लोकनेते स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांची पोकळी स्पष्टपणे मराठा आणि इतर समाजाला देखील जाणवली आहे त्यांची जागा भरून काढण्यासाठी मीटिंगच्या पत्नी डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी राज्यपाल नियुक्त विद्यमान परिषदेचे जागा देऊन मंत्री करावे अशी आग्रह मागणी शिवसंग्राम पिंपरी चिंचवड शहराचे संपर्कप्रमुख पांडुरंग आवारे  पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण या प्रश्नासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई येथील अरबी समुद्रात व्हावे या व अशा अनेक मागण्यासाठी शिवसंग्राम संस्थापक स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे साहेब गेले तीस वर्षे विधान परिषदेच्या सभागृहात भांडत होते प्रत्येक अधिवेशनात सभागृह बंद पाडण्याची देखील भूमिका त्यांनी घेतली होती विधानसभेत देखील काही आमदारांनी विनंती करून व सूचना करून ते सदरील प्रश्न मांडण्यासाठी आग्रह धरत असतात मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यापैकी एक एकाही मागणी पार पडली आहे स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या जाण्याने फक्त मराठा समाजाचा नाहीतर वर लेख केलेला प्रश्न देखील पोरके झाले आहे बहुजनांचे प्रश्न मांडण्यासाठी त्या प्रश्नाविषयी तळमळ असलेले व्यक्ती विधिमंडळात असणे आणि सत्तेत असणे नितांत गरजेचे आहे म्हणूनच स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योतीताई विनायकराव मेटे यांना राज्यपाल नियुक्तीतून विधान परिषदेची आमदारकी देण्यात यावी तसेच बहुजनांचा आवाज खर्‍या अर्थाने बुलंद करून प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना येणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाचे कॅबिनेट खाते देऊन मंत्री करावे अशी आग्रह मागणी शिवसंग्रामने केली असल्याची शिवसंग्राम पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख पांडुरंग आवारे पाटील यांनी नमूद केले आहे.

COMMENTS