निवडणुकीत बहुमत म्हणजे धार्मिक बहुमत नव्हे…: अ‍ॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीत बहुमत म्हणजे धार्मिक बहुमत नव्हे…: अ‍ॅड. असीम सरोदे यांचे प्रतिपादन

अहमदनगर/प्रतिनिधी : केवळ निवडणुकीत मिळालेले बहुमत हे धार्मिक बहुमत आहे असा समज करून घेऊन सध्याच्या सत्ताधार्‍यांनी ‘आवडते नागरिक’ व नावडते नागरिक’ अश

पिंपळदरीत रोटरीच्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी
डॉ. कुमार सप्तर्षी यांना जीवन गौरव पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : केवळ निवडणुकीत मिळालेले बहुमत हे धार्मिक बहुमत आहे असा समज करून घेऊन सध्याच्या सत्ताधार्‍यांनी ‘आवडते नागरिक’ व नावडते नागरिक’ अशी एक भ्रामक संकल्पना तयार केली आहे, असा दावा प्रसिद्ध वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केला. प्रजासत्ताक हा शब्द हद्दपार करून त्याजागी ‘लोकांची सत्ता’ असा बदल केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
अहमदनगरच्या लोकशाही उत्सव समितीद्वारे आयोजित लोकशाही उत्सव 2022 च्या ऑनलाईन कार्यक्रमात पुणे येथील मानवाधिकार कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांचे ’जनता, नागरिक, लोक आणि लोकशाहीतील न्याय’ या विषयावर व्याख्यान झाले. अ‍ॅड. सरोदे म्हणाले, भारतातील लोक केवळ ‘जनता’ न राहता त्यांनी संविधानाला अपेक्षित असणारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समजून घेतली तर घटनात्मकता पाळणारे ‘नागरिक’ तयार होतील, असे सांगून ते म्हणाले, प्रक्रियात्मक न्याय व वितरणात्मक न्याय यांची एकत्रित मोट बांधली नाही तर संविधानमूल्ये अंमलबजावणीच्या पातळीवर बेवारस होताना दिसतील, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, लोक सहभागाला वाव दिल्यानेच परिपक्व नागरिक तयार होऊ शकतात यावर विश्‍वास ठेवून नागरिक तयार करणे हेच महत्त्वाचे रचनात्मक काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या ऑनलाईन सत्रात महाराष्ट्रातील विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अ‍ॅड. सरोदे यांचा कार्य परिचय लोकशाही उत्सव समितीचे सदस्य शिवाजी नाईकवाडी यांनी करून दिला. तर सोनाली शिंदे यांनी आभार मानले. यावेळी शांतीनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ प्रशांत शिंदे, आर्किटेक्ट अर्षद शेख, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अशोक सब्बन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महेबूब सय्यद उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील बाल विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिच्या संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने समारोप करण्यात आला.

COMMENTS