Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटमधील गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई; दोन सराईत गुन्हेगार नांदेड जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार

किनवट । प्रतिनिधी किनवट शहरासह परिसरात दहशत निर्माण करणार्‍या आणि शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अजीत बाबु बेले (वय 32 वर्ष

वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .
भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदारवर गोळीबार

किनवट । प्रतिनिधी
किनवट शहरासह परिसरात दहशत निर्माण करणार्‍या आणि शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अजीत बाबु बेले (वय 32 वर्षे, रा. गंगानगर, किनवट),चंद्रकांत ऊर्फ चंदु बाबु बेले (वय 25 वर्षे, रा. गंगानगर, किनवट) या दोघांवर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 55 अन्वये या टोळीतील दोन सदस्यांना 6 महिन्यांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ’ऑपरेशन फ्लश आऊट’ राबवले जात आहे. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करूनही ज्या गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा होत नाही, अशांविरुद्ध हद्दपारीची शस्त्रे उपसली जात आहेत. किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश व्ही. कराड यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्यामार्फत पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला. प्रस्तावातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी या टोळीला नांदेड जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश (जा.क्र. 598/2025) निर्गमित केले. सदर टोळीवर मालमत्तेचे नुकसान करणे आणि शरीरास दुखापत करण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक शांतता भंग करून दहशत निर्माण करणार्‍या अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून, दोन्ही आरोपींना जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे.

COMMENTS