Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे ः जयंत पाटील

अकोले ः आपले सरकार असताना पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्वेकडे वळवून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मधल्या काळात ते मागे पडले. सरकार आल्यावर ते

तलाठी परीक्षेतील गोंधळाची एसआयटी चौकशी करा
जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही
भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी

अकोले ः आपले सरकार असताना पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्वेकडे वळवून पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मधल्या काळात ते मागे पडले. सरकार आल्यावर ते पुन्हा सुरू केले जातील. असे सांगत  अकोले तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्‍नही मार्गी  लावू विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपल्याला राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे आहे. आपल्याला शाहू फुले आंबेडकरांचा विचार जपणारे, तरुणांच्या हाताला काम देणारे, आया बहिणींचे संरक्षण आणावयाचे करणारे आणावयाचे आहे. आगामी विधान सभेला सकाळी मतदानाला जाताना तुतारी फुंकायची आहे  असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पाटील यांनी अजितदादा  पवार गटात गेलेले विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, महेबुब शेख, अमित भांगरे, सुनिता भांगरे, राजेंद्र गावरी, सुरेश गडाख, बी.जे. देशमुख, विनोद हांडे, राहुल आवारी आदींची भाषणे झाली. यावेळी अनेक भाजप कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केलाया कार्यक्रमास अकोले तालुक्यातील हाजरो नागरिक उपस्थित होते अमित भांगरे यांनी आपल्या आगामी उमेदवारीचे शक्ती प्रदर्शन केले.

COMMENTS