Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती येथे महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

बारामती / प्रतिनिधी : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा

घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक
देहदानाचा निर्णय समाजास दिशादर्शक राहील
माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणू नये; आमदार देसाई यांचे आवाहन

बारामती / प्रतिनिधी : महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दि. 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेत 16 परिमंडलातील 1160 खेळाडू आठ संघाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
वीज कर्मचार्‍यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचे यजमानपद अमरावती परिमंडलाकडे आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि. 12 रोजी सकाळी 9.15 वाजता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक सचिन तालेवार राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे व आदित्य जीवने, संचालक अनुदीप दिघे, योगेश गडकरी व राजेंद्र पवार तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष व नागपूर प्रादेशिक संचालक परेश भागवत, स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, कॅरम आणि ब्रिज आदी 22 क्रीडा प्रकारांचा समावेश असून वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेते व उपविजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील सर्वसाधारण विजेत्या संघाला अजिंक्यपदाचा करंडक प्रदान करण्यात येईल. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम शनिवार, दि. 15 रोजी दुपारी 5 वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात होणार आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी मुख्य अभियंता व आयोजन समितीचे कार्याध्यक्ष अशोक साळुंके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व आयोजन समितीचे सचिव मधुसूदन मराठे तसेच विविध समित्या पुढाकार घेत आहेत.

COMMENTS