Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात महात्मा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात  

राहाता ः भारतातील अस्पृश्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे व मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ स्वतःच्या घरापासून पत्नी सावित्रीबाईस साक्षर व शिक्ष

राहुरीत पोलिस पाटील, मंगल कार्यालय मालकांची बैठक उत्साहात
शहरी भागातील शिक्षकांनी जाणून घेतले दिल्ली मॉडेल
प्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’ LokNews24

राहाता ः भारतातील अस्पृश्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे व मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ स्वतःच्या घरापासून पत्नी सावित्रीबाईस साक्षर व शिक्षिका बनवून सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे बीज रोवणारे महात्मा फुले यांच्या 133 व्या स्मृतिदिनानिमित्त राहता शहरात आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले
याप्रसंगी समता परिषदेचे राहता तालुकाध्यक्ष किशोर बोरावके गणेशचे संचालक भगवानराव टिळेकर माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, ग्रुप विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर, विलासराव टिळेकर साहेबराव निधाने, धनंजय गाडेकर, मच्छिंद्र बनकर मच्छिंद्र निधाने, कैलास बापू सदाफळ, विलासराव टिळेकर डॉक्टर सुरेश जेजुरकर, नंदू माळवदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल सोमवंशी, भिवसेन गाडेकर, शिवाजी बनकर बाबासाहेब गाडेकर, अशोक गाडेकर, तालुका उपाध्यक्ष चेतन गाडेकर, महेंद्र आनप, स्वाधीन गारेकर, बाबासाहेब गाडेकर, अशोक गाडेकर, मेजर संदीप जेजुरकर, स्वप्निल गाडेकर, अनिल बोठे, विशाल गाडेकर राजेंद्र जेजुरकर, आदी बहुसंख्येने उपस्थित होते. सदरचे कार्यक्रमाचे आयोजन राहाता तालुका समता परिषद व राहाता तालुका ओबीसी महामोर्चा, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, राहता तालुका ओबीसी एल्गार समिती, राहता शहर समता परिषद शहराध्यक्ष संतोष लोंढे तालुका संपर्क व प्रसिद्धीप्रमुख प्राध्यापक अनिल पावटे, विशाल पर्वत यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS