कोपरगाव शहर ः शिव उपासना करतांना संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजसुधारक म्हणून सगळे भेद मिटवून सामाजिक समरसतेचे कार्य एकात्मतेचा संदेश देणारे असल

कोपरगाव शहर ः शिव उपासना करतांना संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजसुधारक म्हणून सगळे भेद मिटवून सामाजिक समरसतेचे कार्य एकात्मतेचा संदेश देणारे असल्याचे अक्षय तृतीया या शुभदिनी संत महात्मा बसवेश्वर यांची जयंती शैव संप्रदाय, लिंगायत, जंगम, गवळी सह महात्मा बसवेश्वर विचारांचे नागरिकांकडून तिथी नुसार साजरी केली जाते. महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करतांना आपल्या प्रत्येकाचे घरी त्यांची प्रतिमा पुजनासाठी असावी या हेतूने माजी सैनिक कै.आर. बी. (रामलिंग बाळाप्पा) तथा आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठाण, कोपरगांव वतीने महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा कौटुंबिक पुजनासाठी आणि शिव उपासनेत महत्त्वाचे मानलेले बेलाचे रोप वितरण प्रभू श्रीरामचंद्र यांनी पावन केलेल्या श्री क्षेत्र राघवेश्वर महादेव देवस्थान येथे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज, कुंभारी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले, माजी सैनिक कै.आप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठानच्या विश्वस्त रजनीताई नलगे, प्रकाश घोडके, अर्चना घोडके,सुरेश घोडके, दिलीप घोडके,संतोष नलगे,सोमनाथ निळकंठ, सुशांत घोडके,शिवप्रसाद घोडके, आर्यन घोडके, राघवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोपिनाथ निळकंठ, राजेंद्र निळकंठ, ग्रामपंचायत सदस्या कविता निळकंठ, बजरंग दलाचे अध्यक्ष अभिजित चकोर, मुक्ताबाई वाळेकर, शोभा निळकंठ,सोनाली निळकंठ, सोनाली महाजन, सायली नीलकंठ, गीता महाजन, अतुल निळकंठ, गंगाधर निळकंठ, जितेंद्र महाजन, आदित्य महाजन, ललित निळकंठ , कार्तिक निलकंठ, संदीप चंद्रकांत निळकंठ , आकाश निळकंठ , अरुण निळकंठ, प्रतीक दिलीप निळकंठ, गणेश गंगाधर निळकंठ , प्रकाश निळकंठ, प्रवीण अशोक निळकंठ,धनंजय निळकंठ,सतीश निळकंठ,अशोक निळकंठ, बाळासाहेब निळकंठ, वाल्मिक निळकंठ ,भारत निळकंठ, योगेश निळकंठ, रावसाहेब निळकंठ आदींसह कुंभारी येथील निळकंठ परिवार उपस्थित होते. प्रारंभी महंत राघवेश्वरानंदगिरी यांचे संतपुजन करून त्यांचे शुभहस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमा अनावरण करण्यात आले. सुत्रसंचालन अतुल निळकंठ यांनी तर आभार सुशांत घोडके यांनी मानले. या विचारशील उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होते आहे.
COMMENTS