नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई हे शहर ति
नवी दिल्ली ः केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई हे शहर तिसर्या क्रमांकावर आहे. स्वच्छ राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, मध्य प्रदेश दुसर्या तर छत्तीसगढ तिसर्या क्रमांकावर निवड झाली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा निकाल जाहीर केला. राजधानीतील दिल्लीतील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी यांनी या राज्यांच्या प्रतिनिधींचा गौरव केला. यावेळी एकूण 9500 गुणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सुरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई या शहराचा तिसरा क्रमांक आहे इंदूरने सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक मिळवण्याचं हे सलग सातवे वर्ष आहे. गुजरातमधले सूरत हे शहर दुसर्या क्रमांकावर आहे. तिसर्या क्रमांकावर महाराष्ट्राची नवी मुंबई, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे विशाखापट्टणम आणि पाचव्या क्रमांकावर मध्य प्रदेशचे भोपाळ आहे.
एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. गंगा किनार्यावरील स्वच्छ शहरांत वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसर्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशातील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार चंदीगडला देण्यात आला.2022 मध्ये मध्य प्रदेश राजस्थान-महाराष्ट्राला मागे टाकून देशातील सर्वात स्वच्छ राज्य बनले होते. 100 हून अधिक शहरे असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी इंदूरने क्लीनिंग सिक्सर लावला होता. भोपाळही सातव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर पोहोचले आहे. 2017 आणि 18 मध्ये भोपाळ हे देशातील दुसर्या क्रमांकाचे स्वच्छ शहर होते. 2016 मध्ये फक्त 73 शहरे होती. तेव्हाही इंदूर क्रमांक-1 वर होते. आता या शर्यतीत 4355 शहरांचा समावेश होता. तरीही इंदूरने नंबर-1 चे विजेतेपद मिळवले. 2017 पासून इंदूर देशात प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-2020 मध्ये मध्य प्रदेशला एकूण 27 सन्मान मिळाले आहेत. यामध्ये 18 शहरे स्टार रेटिंगसाठी आणि 9 शहरे स्वच्छ सर्वेक्षणासाठी होती. तर 2021 च्या सर्वेक्षणात एकूण 35 पुरस्कार प्राप्त झाले.
नवी मुंबई तिसरी, छोट्या शहरांत सासवड अव्वल – स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई या शहराने तिसरा क्रमांक पटकावला असून एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम, छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी आठ ते दहा शहरांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, जेजुरी, शिरुर, भोर, सासवड, लोणावळा यांचा समावेश असून यापैकी प्रत्येक नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यापूर्वी विविध गटामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. सासवड नगरपरिषदेने या स्पर्धेकरिता जय्यत तयारी केली होती.
COMMENTS