Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्र बनले निवडणूकीचे रणमैदान 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सरकारही गठित झाले. आता यापुढील राजकारणाच्या दृष्टीने देशभरात नव्या पद्धतीने बांधणी आणि राजकीय डावपेच केले जाती

ओबीसींच हिसकावण्यासाठी नवा अध्यक्ष ? 
ई-लर्निंग लोककल्याणविरोधी ! 
धर्माचा विवेक शाबूत ठेवा !

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन सरकारही गठित झाले. आता यापुढील राजकारणाच्या दृष्टीने देशभरात नव्या पद्धतीने बांधणी आणि राजकीय डावपेच केले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी सहा महिन्याच्या आत महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्र हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप ची एनडीए आघाडीच्यासाठी महाराष्ट्राच्या निवडणुका जिंकणं, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याच वेळी नितीश कमार हे बिहारच्या निवडणुकांना एक वर्ष बाकी असताना बिहार विधानसभा निवडणुका घोषित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यावर आता दबाव टाकत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला जर आपण पाहिलं तर अजित पवार हे महायुतीच्या दृष्टीने एक प्रकारे ओझे बनले आहेत. कारण, त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत कोणतीही भरीव कामगिरी दाखवता आली नाही. त्यांना मिळालेल्या एकूण चार जागांपैकी एकाच जागेवर त्यांना विजय मिळाला असला तरी, तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा असण्यापेक्षा तटकरे यांचा वैयक्तिक शक्तीचा तो विजय आहे, असं मानल जात आहे. नुकताच ऑर्गनायझर मध्ये प्रकाशित झालेल्या लेखातही अजित पवार यांच्या विषयी जी मतं मांडली गेली आहेत, ती संघाची अधिकृत मत आहेत आणि त्यामुळे अजित पवार यांच्या राजकारणाला गंभीरपणे घेतलं जात नाही.

अजित पवार यांच्यामुळे भाजपाची वोट बँक कमी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शिवाय, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांची केवळ एक राज्यमंत्रीपदाच्या पदावर भलावन करण्याचा घेतलेला निर्णय, हा अजित पवारांनाही पसंत पडलेला नाही. त्यामुळे अजित पवार आणि महायुती यांच्या मधलं अंतर वाढत असतानाच राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार यांना पुन्हा पक्षांतर्गत टीकेला ही सामोर जावं लागत आहे.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या कुटुंबातच प्रत्यक्ष उमेदवारी दिली आणि तिथे पराभव झाल्यामुळे राज्यसभेची उमेदवारी ही ते कुटुंबातच घेत आहेत. त्यामुळे या विषयावरून पक्षांतर्गत ठिणगी पडेल अर्थात ही ठिणगी पळण्यामागची कारण कारणे पण आहेत शरद पवार यांच्याकडे जाण्यासाठी जे आतुर आहेत ते अजित पवार यांना घेतल्याशिवाय राहणार नाहीत एकंदरीत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठे फेरबदल झालेले असतील आणि हे फेरबदल निश्चितपणे आगामी काळातील राजकीय रणनीतीचा बदल किंवा स्थिती याबाबत एक स्पष्टता निर्माण झालेली दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले असताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळ काही वेळ थांबून त्यांनी हस्तांदोलन केले. असे दृश्य गेल्या १० वर्षात कधीच दिसले नाही. याचा एक अर्थ हा देखील काढला जात आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे चालणार नाहीत, म्हणून नितीन गडकरी यांना सक्रीय करण्याची भूमिका नरेंद्र मोदी घेऊ शकतात. अर्थात, महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत सत्तबदलाचा जननिश्चय दिसून येत असल्याने केंद्राने फार आटापिटा करूनही परिस्थिती फार बदलू शकत नाही, असाच सूर सर्वत्र दिसतो. एकंदरीत, लोकसभा निवडणूका संपल्यानंतर महाराष्ट्र अधिकच निवडणूकमय होताना दिसत आहे. याचा अर्थ पुढची सहा महिने महाराष्ट्र  राजकीय लढ्याचे मैदान राहील!

COMMENTS