Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत लम्पीचा धोका वाढला

जनावरांचा आठवडी बाजार आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी

सांगली ः जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे.याचपार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील जनावरांचे आठव

बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 

सांगली ः जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे.याचपार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार आणि बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच लम्पी बाधित झालेल्या जनावरांची नोंद लवकरात लवकर शासकीय दवाखान्यात करण्यात यावी, असे आवाहन पशू संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यावर गेल्या वर्षभरापासून लम्पी रोगाचे संकट घोंगावत आहे. यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. जिल्ह्यात अवघ्या 11 दिवसांत 92 जनावरे लम्पीच्या जाळ्यात अडकले आहेत. लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जनावरांचा आठवडी बाजार आणि बैलगाडा शर्यतीवर काही कालावधीपर्यंत बंदी घातली आहे. संबंधित गावातील बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि चार्‍याची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले. लम्पीचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य मात्रा बनवणार्‍या संस्थांमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवण्याचे आदेश देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावारांची संख्या 855 वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक जनावरे वाळवी तालुक्यातील आहेत. तर, शिराळा- 283, पलूस- 256, मिरज- 23, तासगाव- 13, कवडेमहांकाळ- 18 आणि कडेगाव तालुक्यातील 11 जनावर बाधित झाले आहेत. लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधित जनावरांवर पशू वैद्यकीय पथकांमार्फत उपचार केले जात आहेत. तसेच बाधित नसलेल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे.

लम्पीचे लक्षणे
– प्रथम जनावरांना ताप येतो, त्यानंतर त्वचेवर गाठी येतात.
– तोंडात, घशात व श्‍वसननलिका, फुप्फुसात पुरळ व फोड येतात.
– जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते.
– जनावरांमध्ये अशक्तपणा, भूक मंदावते आणि डोळ्यांमध्ये जखमा होतात.

COMMENTS