क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

Homeताज्या बातम्यादेश

क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

या उड्डाण चाचण्यांच्या दरम्यान या मोहीमेची सर्व उद्दिष्टे साध्य झाली

चांदीपूर प्रतिनिधी : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने ओडिशा किनार्‍यावरील चांदीपूर एकात्मिक परिक्षण केंद्रावरून शीघ्र प

खंबाटकी घाटात रविवारचा दिवस कोंडीचा
कराड तालुक्यात साडेसत्तावीस लाखांची वीज चोरी
पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख

चांदीपूर प्रतिनिधी : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराने ओडिशा किनार्‍यावरील चांदीपूर एकात्मिक परिक्षण केंद्रावरून शीघ्र प्रतिसाद देणार्‍या जमीन ते आकाश मारा करणार्‍या क्षेपणास्त्र प्रणालीच्या सहा उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतल्या. भारतीय लष्कराच्या मूल्यांकन परीक्षणाचाच या उड्डाण चाचण्या या एक भाग होत्या.
या उड्डाण चाचण्या उच्च वेगाच्या हवाई लक्ष्यांच्या विरोधात घेण्यात आल्या ज्यात विविध स्वरूपाच्या आकाशस्थ धोक्यांचा समावेश होता. भारतीय क्षेपणास्त्रांच्या क्षमतेचे विविध परिस्थितींमध्ये म्हणजे दीर्घ पल्ल्याचे मध्यम उंचीवरील लक्ष्य, लघु पल्ल्याचे लक्ष्य, उंच प्रदेशातील युद्धाभ्यासातील लक्ष्य, रडारवरील वेगवेगळ्या अवस्थांतील लक्ष्य आणि लागोपाठ अतिवेगाने मारा करणारे दोन लक्ष्ये यांवर मारा करून मूल्यांकन करण्यात आले. दिवसा आणि रात्रीच्या परिस्थितीतही प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. या उड्डाण चाचण्यांच्या दरम्यान या मोहीमेची सर्व उद्दिष्टे साध्य झाली आणि स्फोटके वाहून नेणार्‍या क्षेपणास्त्र साखळीसह अत्याधुनिक मार्गदर्शन तसेच आदेश आणि नियंत्रण नियमावलीसह मारा करणार्‍या क्षेपणास्त्र प्रणालीची अचूकताही प्रस्थापित झाली.

COMMENTS