Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये सातव्यांदा फुलले कमळ  

हिमाचलप्रदेशात काँग्रेसने मिळवली सत्ता

नवी दिल्ली प्रतिनिधी - तब्बल 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून, या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने सत्ता राखत आपले प्रतिस्पर्धी काँ

मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – मंत्री मुनगंटीवार
बालाघाटावरील शेतपिकांचे वराहांकडुन नुकसान
कर्तव्यावरील खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन !

नवी दिल्ली प्रतिनिधी – तब्बल 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून, या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपने सत्ता राखत आपले प्रतिस्पर्धी काँगे्रस आणि आम आदमी पक्षाला अस्मान दाखवले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षा यंदा सर्वांधिक जागा जिंकत भाजपने एक नवा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला आहे. भाजपला 182 जागांपैकी तब्बल 150 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र भाजपला आपली सत्ता राखता आलेली नाही. अटीतटीच्या लढतीत काँगे्रसने मुसंडी मारत विजयाजवळ येऊन ठेपली आहे. मात्र हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष आमदारांवर मोठी मदार असल्यामुळे या राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण रंगणार असल्याची शक्यता आहे.


हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांचे निकाल जाहीर झाले असून, काँग्रेसने 40 जागांवर विजय मिळवला आहे. तर 25 जागांवर भाजपला राखता आल्या आहेत. इतर उमेदवारांनी 2 जागा जिंकल्या. ’आप’ला अद्याप खाते उघडता आलेले नाही. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या निकालावर ते म्हणाले की, जनतेचा निकाल आम्हाला मान्य आहे. पाच वर्षांच्या सहकार्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. राज्याच्या विकासासाठी सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावू असे ठाकूर यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष भाजपला कडवी टक्कर देईन, असे बोलले जात होते. मात्र आपने काँगे्रसची मते खेचून घेत, भाजपला विक्रमी जागा राखण्यात एकप्रकारे मदतच केल्याचे निकालावरून दिसून येते. 2017 च्या निवडणुकीत काँगे्रसने 70 पेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदा त्यांना केवळ 18-20 जागांच्या पुढे जाता आलेले नाही. त्यामुळे काँगे्रसच्या जागा पाडण्यात आपने मोठी मदत केल्याचे दिसून येत आहे.  गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केंद्रस्थानी होते. गुजराती अस्मितेचे प्रतीक म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये एकूण 27 जाहीर सभा घेतल्या.

अहमदाबादमध्ये सलग दोन दिवस 16 विधानसभा मतदारसंघातून 40 किलोमीटरचा रोड शो केला. या प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंतच्या कामाचा पाढा वाचला. मागील पाच वर्षात मोदी हे सातत्याने वेगवेगळ्या योजनांच्या उद्घाटनाच्या किंवा पायाभरणीच्या निमित्ताने गुजरातमध्ये येत राहिले. जनतेशी संपर्क साधत राहिले. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणली गेली. पायाभूत सुविधांच्या विकासात गुजरातने अनेक टप्पे गाठले आहेत. त्यात ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’चाही समावेश आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या 93 मीटर उंच ’स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या दुप्पट उंचीचा 182 मीटरचा ’स्टॅच्यू ऑफ युनिटी’ केवडिया येथील सरदार सरोवर धरणाच्या जवळ उभा केला. सरदार पटेल यांचे हे स्मारक उभे राहिल्यानंतरच्या दीड वर्षांत पर्यटनाच्या माध्यमातून सुमारे 120 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

निवडणुकीच्या काही दिवस आधीच 1.54 लाख कोटी रुपयांचा फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये खेचून आणला गेला. राज्यातील सत्ताविरोधी लाटेची दखल घेऊ भाकरी परतण्याचे काम मोदी-शहा जोडीने केले. मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं. त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री आणि नवीन मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली. त्याद्वारे पक्षातील नाराजी कमी करण्याचा आणि गळती रोखण्याची तजवीज करण्यात आली. भाजप हा विकास आणि जनहिताशी तडजोड करणार नाही, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला. त्यातून गुजराती जनतेचा भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

पाटीदार समाजाची भूमिका ठरली निर्णायक – 2017 च्या निवडणुकीत पाटीदार समाजाने आरक्षणासाठी भाजपला कडवी टक्कर दिली होती. मात्र यंदा पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेलच भाजपमध्ये सहभागी झाल्यामुळे पाटीदार समाज भाजपच्या बाजूने असल्याचा एक संदेश मतदारांमध्ये गेला. गुजरात राज्यात पाटीदारांची लोकसंख्या सुमारे 11 टक्के असल्याचे मानले जाते. सुमारे 40 विधानसभा मतदारसंघांमध्ये पाटीदार मतदार निर्णायक भूमिका बजावतात. 1980 पर्यंत पाटीदार समाज ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक मानली जात होती. नंतर 1990 पासून हा समाज भाजपसोबत गेला. मात्र, 2015 मध्ये आरक्षणाच्या मागणीवरून पाटीदारांनी भाजपविरोधात बंड केले. पाटीदारांचा समाजातील मतदार 2017 मध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या बाजूनं झुकला होता. त्याचा भाजपला मोठा फटका बसला. मात्र हार्दिक पटेल भाजपसोबत गेल्यामुळे पाटीदार समाजाची मते भाजपला मिळाल्याचे या निकालावरुन दिसून येते.

गुजरातमध्ये 12 डिसेंबरला होणार शपथविधी – गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील म्हणाले की, गुजरातचे नवे मुख्यमंत्री 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीचा जनादेश आता स्पष्ट झाला आहे, दोन दशकांपासून सुरू असलेला गुजरातचा विकासाचा हा प्रवास सुरू ठेवण्याचे इथल्या जनतेने ठरवले आहे. येथील जनतेने पुन्हा एकदा भाजपवर अढळ विश्‍वास दाखवला आहे.

गुजरात निवडणूक निकाल
एकूण जागा 182
भाजप – 156
काँगे्रस- 17
आप -5
अपक्ष-4

हिमाचल प्रदेश निकाल
एकूण जागा -68
काँगे्रस -40
भाजप -25
अपक्ष -3

COMMENTS