Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगणक कर्मचार्‍यांना कनिष्ठ लिपिक पदाची लॉटरी

मुंबई/प्रतिनिधी ः सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रिमंडळाची मान्यता न घेता एकाकी पद असलेल्या संगणक पदासाठी राबवण्यात आलेल्या वर्ष 2008 मधील निवड झ

पंजशीरच्या खोर्‍यात 350 तालिबान्यांचा खात्मा
राज्यभर मराठा आंदोलनाची धग कायम
कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान

मुंबई/प्रतिनिधी ः सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रिमंडळाची मान्यता न घेता एकाकी पद असलेल्या संगणक पदासाठी राबवण्यात आलेल्या वर्ष 2008 मधील निवड झालेल्या कर्मचार्‍यांना 2019 मध्ये बेकायदा कनिष्ठ लिपिक पदावर समावेश केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्यामुळे कनिष्ठ लिपिक पदावर समावेश केल्यामुळे यामध्ये मोठया प्रमाणावर आर्थिक हितसंबंध जपल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कोणत्याही पदाच्या समावेशनाची प्रक्रिया करायची असल्यास धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय एक साधे परिपत्रक काढून तत्कालीन शेकडो संगणक पदावरील कर्मचार्‍यांना बेकायदा पद्धतीने कनिष्ठ लिपिक करण्यात आल्याचा आरोप राज्य कर्मचारी महासंघाने केला आहे. वर्ष 2004 मध्ये राज्याच्या उच्च स्तरीय आकृतीबंध समितीने सार्वजनिक बांधकाम विभागासाठी संगणक पदाची निर्मिती केली होती. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाने 2008 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया घेऊन, एकाकी असलेल्या संगणक पदावर कर्मचार्‍यांची निवड केली. संगणक पद एकाकी पद असल्याने भविष्यात निवृत्त होईपर्यंत पदोन्नती मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर संगणक कर्मचार्‍यांनी पदोन्नतीसाठी शासनाकडे अर्ज केले मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मंत्रालयातील अधिकार्‍यांनी पाटबंधारे विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन, एक परिपत्रक काढून शेकडो संगणक चालकांना 2019 मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर बेकायदा समावेशन केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात पदोन्नतीचा घोळ झाला आहे. कनिष्ठ लिपिक पदावर 50 टक्के सरळ सेवा भरती आणि 50 टक्के नियमित पदोन्नतीने भरण्यात येते. मात्र त्याऐवजी संगणक कर्मचार्‍यांना बेकायदा कनिष्ठ लिपिक पदावर समावेश केल्याने आता पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना पदोन्नती पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बेकायदा असलेले परिपत्रक रद्द करून, संबधित अधिकार्‍यावर कारवाई करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमबाह्य परिपत्रक काढून कनिष्ट लिपीक पदावर नियुक्ती तारखेपासून समावेशन आणि थकबाकी दिली आहे. वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाची मंत्रीमंडळाची मान्यता न घेता सदर परिपत्रक काढले आहे. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान झाले आहे. कनिष्ट लिपीक हे पद पदोन्नती व सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरावयाचे असताना पदोन्नतीस पात्र असलेल्या कर्मचार्‍यांवर व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे नियमबाह्य परिपत्रक पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावे आणि नियमबाह्य परिपत्रक निर्गमीत केलेल्या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी.
सुर्यकांत इंगळे ,सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघ मुंबई.

कनिष्ठ लिपिक पदासंदर्भात सध्यातरी माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. संबंधित अधिकार्‍यांशी बोलून अधिकृत माहिती देण्यात येईल.
सदाशिव सांळुखे, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग

एकाकी पद म्हणजे काय? – राज्य वेतन सुधारणा समिती 2017 अंतर्गत समितीचे अध्यक्ष के पी बक्षी यांनी एकाकी पदाची व्याख्या सांगितली आहे. एकाकी पद म्हणजे त्या कार्यालय प्रमुखाच्या, विभाग प्रमुखाच्या कार्यालयास, मंत्रालयीन प्रशासकीय विभागास मंजूर केलेल्या आकृतिबंधामध्ये अंतर्भूत असलेले विशिष्ट संवर्गाचे एकमेव पद, ज्या पदास पदोन्नतीच्या साखळीमध्ये आकृतिबंधानुसार, पदोन्नतीच दिली जात नाही.

COMMENTS