नवी मुंबई ः कफ प्रेड कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा मुंबई येथील झोपडपट्टीमध्ये स्थानिक कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल केली जात अस
नवी मुंबई ः कफ प्रेड कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा मुंबई येथील झोपडपट्टीमध्ये स्थानिक कार्यकर्त्याकडून वेगवेगळ्या प्रकारची दिशाभूल केली जात असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारण येथील स्थानिकांकडून झोपडीवासियांचे सरकारी दस्त मागवले जात असून प्रकल्प अद्याप एसआरएमध्ये नोंद नाही. यामुळे सरकारी कागदपत्रे घेऊन कोणता स्कॅम होत आहे का? याची चौकशी करावी अशी मागणी पत्रकार डॉ. राजन माकनिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याठिकाणी संस्था एसआरएमध्ये नमूद असल्याचे सांगून रहिवाश्यांकडून त्यांची सर्व सरकारी दास्तायेवाज जमा केली जातं आहेत. सहाशेच्या वर लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीमध्ये 4 ते 5 वेळेस नवे नवीन विकासक येऊन गेलीत. त्या सर्व विकासकासोबत स्थानिक बोगस संस्थेने करार केला, एका विकासाकाने तर लाख लाख रु दिले, ती रक्कम गेली रहिवाशी्यांमध्ये न वाटता गेली कुठे? त्याबद्दलची माहिती व पत्रव्यवहार स्वयंघोषित कमिटी नागरिकांना द्यायला तयार नाही हे काय गौडबंगाल आहे. झोपडपट्टी प्रचंड घोटाळा झाला असून आलेल्या सर्व विकासकामांची करार व त्यांच्याशी झालेला आर्थिक देणेघेण्याचा व्यवहार उघड झाल्यास असे समजून येईल की, या लोकांनी स्वतःची पोळी भाजून घेतली आहे. गमरे नावाची वकील असणारी व्यक्ती कायद्याचा धाक दाखवून प्रश्न विचारणार्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवू असे सांगून धमकवतात तर अपात्र आहात पात्रतेसाठी मोठी रक्कम घेऊन सरकारी नियम धाब्यावर ठेवून स्वतःचा स्वार्थ साधला जात आहे. समजभूषण पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी सदर प्रकरणावर एक समिती स्थापन करून सत्यता तपासून पीडित लोकांना न्याय मिळावा व योग्य विकासाकांकडून यांचे पुनर्वसन करवून देण्यात यावे अशी मागणी केली असून विकासका ला अंधारात ठेवून अर्थकारण करणार्या व स्थसनिक रहिवाशी्यां कडून दास्तायेवाज व अपात्रतेची भीती दाखवून पात्रतेसाठी लुबाडणूक करून आशेवर ठेवून फसवणूक करणार्या स्वयंघोषित सोसायटी चालक जसे शिव शास्त्री नगर मच्छिमार नगर 5 भगवान बॅनर्जी, एसआरए झोपडपट्टी अध्यक्ष रुके रामचंद्र, मोरे प्रकाश, द्वितीय कमिटी श्याम मांगेला रमण पावसे, साळवी, विजय व भास्कर तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांना केली आहे
COMMENTS