Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रग्ज प्रकरणात 5 फरार आरोपींविरुद्ध लूकआऊट नोटीस

पुणे ः पुणे पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटप्रकरणाचा पर्दाफाश केला असून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिस शोधघेत आहेत. या प्रकरणात मुख्यआरोपी म्हणून संदीप धुनिय

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक होणार ?
‘बा विठ्ठला… राज्यात सुख व समृद्धी नांदू दे : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!

पुणे ः पुणे पोलिसांनी ड्रग्ज रॅकेटप्रकरणाचा पर्दाफाश केला असून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पोलिस शोधघेत आहेत. या प्रकरणात मुख्यआरोपी म्हणून संदीप धुनिया याब्रिटिश नागरिकाचे नाव समोर आले असून दिल्ली येथून थेट लंडनलाएमडी ड्रग्ज पाठवण्यात येतअसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात संदीप धुनिया हा परदेशात फरार झाला असून त्याच्यासह दिल्लीतील कारभार पाहणारा वीरेंद्र सिंग, बिहारमधील पाटणा येथील सोनम पंडित, मूळचा पश्‍चिम बंगालचा व दिल्लीत कारभार पाहणारा अशोक मंडल व पुणे-मुं ईदरम्यान ड्रग्जतस्करी करणारा आणखी एक आरोपी अशा पाच जणांविरोधात लूकआऊट नोटीस काढली आहे. तसेच या आरोपींविरोधात रेड कॉर्नरनोटीस देखील बजावण्याची तयारी पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांची चार ते पाच पथके देशात विविध ठिकाणी अद्याप फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पश्‍चिमबंगाल येथून पुणे पोलिसांच्या पथकाने सुनील बर्मन या आरोपीलाअटक केली आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने, अजयअमरनाथ करोसिया, हैदर नूर शेख, भीमाजी परशुराम साबळे (सर्वरा.पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ(मुंबई) तर दिल्ली येथून दिवेश भुतिया आणि संदीपकुमार यांच्यासह अय्युब अकबर मकानदार (रा.सांगली) या नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींच्या नावावर असलेली वेगवेगळी बँक खाती, मालमत्ता तसेच रोकड, दागदागिन्यां बाबतही आयकर विभागाकडून पुणे पोलिस माहिती मिळवत आहेत.

COMMENTS