Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा / प्रतिनिधी : लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध
राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा
फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्मगावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे स्मारक उभे करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण पसरणी, ता. वाई येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, राधाबाई साबळे, महंत सुंदरगिरी महाराज, यशोमती शिंदे, अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजाराम निकम, संजय साबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तीसंग्राम अशा विविध चळवळींमध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गाण्यांचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्यासह विविध दिग्गज मंडळींशी त्यांचा संपर्क आला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शाहीर साबळे यांचे विचार पुढच्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करावेत.

COMMENTS