Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला होणार ?

‘ती’ तारीख संदर्भासाठी वापरल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेली नसली तरी, या निवडणुकीची तारीख 16 एप्रिल असल्याचे निवडणूक आय

बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला केली शिवीगाळ, पाहा व्हिडिओ l
 पतीवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी महिलेचे टॉवरवर चढून केले शोले स्टाईलने आंदोलन
चाळीसगावच्या दिंडीत…रंगला रिंगण सोहळा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेली नसली तरी, या निवडणुकीची तारीख 16 एप्रिल असल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसून येत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देत निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचे आयोगाने सांगितले. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या चर्चांना आता लगाम लागला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रावर जरी स्पष्टीकरण दिले असले तरी, केंद्रीय निवडणूक आयोगाचे गोपनीय पत्र व्हायरल कसे झाले, याबाबत तर्क-वितर्क लढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करत असतात, त्यात लोकसभेची निवडणूक किती टप्प्यात घेण्यात येणार आहे, कधी मतदार होणार आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली जाते. मात्र त्यापूर्वीच एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरणे द्यावे लागलं आहे. निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकार्‍यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर 16 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ’भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात ट्विटरवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती.

COMMENTS