Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करा

आ.संदीप क्षीरसागरांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना पत्र

बीड प्रतिनिधी - बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सुनचा अर्धा कालावधी  लोटला असून त्यात पावसाचे प

आ.संदीप क्षीरसागरांनी केली परिवर्तनाची सुरुवात !
पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !
येणार्‍या कुठल्याही निवडणुकीत घरचा उमेदवार देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्हाभरात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सुनचा अर्धा कालावधी  लोटला असून त्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.  या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्यात यावा तसेच खरीप हंगामातील कर्जमाफी करण्यात यावी व यासह इतर आवश्यक मदत होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनस्तरावरून अवर्षणग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात मागील 21 दिवसांपासून पाऊस झाला नाही. सुरूवातीच्या काळात कमी पाऊस असूनही बर्यापैकी पिके आली होती. परंतु मागील तीन आठवड्यांपासून पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हंगामात सोयाबीन, मूग, उडीद, कापूस यांसह इतर पिके शेतकर्‍यांनी केली आहेत. परंतु पावसाने, पिकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या काळातच दडी मारल्याने पिकांचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटातून शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्यात यावा. तसेच खरीप हंगामातील कर्ज पूर्णपणे माफ करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात यावे. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच याबाबतचा योग्य प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची विनंती जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे आ.क्षीरसागर यांनी केली आहे.

COMMENTS