Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारच्या जिल्हा रुग्णालयात ओमिक्रॉन बाधितांसाठी अख्खा अतिदक्षता वार्ड राखीव

सातारा / प्रतिनिधी : परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक

सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक
सावकारांनो याद राखा : धन्यकुमार गोडसे
कोविडच्या नव्या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक भाग म्हणून नव्या व्हायरसने बाधित झालेल्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील एक आयसीयू वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणार्‍या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने परदेशातून आलेल्या नागरिकांचे होम आयसोलेशन व आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला आहे. गेल्या 20 दिवसांत जिल्ह्यात विविध देशांतून 503 नागरिक आले आहेत. या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच आरेाग्य विभागाकडून या नागरिकांच्या गृहविलगीकरणाकडे लक्ष ठेवले जात आहे.
या प्रक्रियेच्या माध्यमातून फलटण तालुक्यात युगांडा या देशातून आलेल्या नागरिकांची तपासणी झाली. कोरेाना पॉझिटिव्ह आल्यानंतर व्हायरस कोणता आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यामध्ये तीन नागरिकांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. हे नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. फलटणचे बाधित आल्यानंतर झालेल्या इतर नागरिकांच्या तपासणीत परदेशातून आलेले आणखी काही जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली असण्याचा संशय वैद्यकीय अधिकार्‍यांचा आहे. त्यानुसार संबंधितांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
ओमिक्रॉन बाधित असल्याचा नवा रुग्ण अद्याप समोर आला नसला तरी, जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ते उपचार तातडीने करता यावेत, यासाठी तयारी केली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण हे अन्य कोरोना बाधित रुग्णांसोबत ठेवले जाणार नाही. त्यातून कोरोनाच्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे.
अतिदक्षता वार्डमध्ये 14 बेडची व्यवस्था
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील तीन अतिदक्षता विभागांपैकी एक 14 बेडची व्यवस्था असलेला एक आयसीयू ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर या रुग्णांना कशा प्रकारे उपचार द्यायचे, कोणती दक्षता घ्यायची याबाबतची माहितीही आरोग्य विभागाने घेतली आहे.

COMMENTS