Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भागवत कथेतून आयुष्याचे कल्याण-उद्धव प्रभुजी

श्री सोमेश्वर मंदिरात भागवत सप्ताहाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड प्रतिनिधी - भागवत कथेतून प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचे कल्याणच होणार आहे. प्रभू वेद व्यास ऋषीमुनींनी हा दिव्य ग्रंथ समस्त मानवांच्या कल्याण

पोटनिवडणुकीत भाजपकडून दहशतीचा वापर
कराड शहरातील वखारीला मध्यरात्री भीषण आग
न्यूड फोटोशूट करून रणवीर सिंग अडचणीत.

बीड प्रतिनिधी – भागवत कथेतून प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचे कल्याणच होणार आहे. प्रभू वेद व्यास ऋषीमुनींनी हा दिव्य ग्रंथ समस्त मानवांच्या कल्याणासाठी निर्माण केला आहे.तेव्हा भागवत प्रत्येक व्यक्तीने शेवटच्या श्वासापर्यंत प्राशन केले पाहिजे असे मत उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री वृंदावन यांनी व्यक्त केले. बीड येथील बार्शी रोडवर बिंदुसरा नदीच्या तीरावर नयनरम्य आणि जाज्वल्य सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांच्या आयोजनातून 2 ऑगस्ट रोजी पुरुषोत्तम अधिक मास व श्रावण मास या पावण पर्वा निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या भागवत कथेचे दुसरे पुष्प गुंफताना वृंदावन येथील उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री म्हणाले की, मनुष्याचा उद्धार होण्यासाठी भागवत वाचले पाहिजे, ऐकले पाहिजे.6 प्रश्नांमध्ये संपूर्ण भागवत दडलेले आहे. जो आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतो तोच तुमचा खरा गुरु असतो. गुरुप्रती आपण कायम आदर ठेवला पाहिजे.अधिक मास व श्रावण मास या पावन पर्वा मध्ये श्रीमद् भागवत कथा  प्राशन केली पाहिजे असे मत व्यक्त करून भागवत ऐकण्यासाठी आपण नेहमीच यावे व आपल्या सोबत इतरांना देखील भागवत कथेला आणून पुण्य कर्म पदरात पाडून घ्यावे असे आवाहन उद्धव प्रभुजी भक्ती शास्त्री वृंदावन यांनी करून दुसर्‍या सत्राला विराम दिला. भागवत कथेला मान्यवरांच्या शुभहस्ते आरती करून प्रारंभ झाला तर श्रीमद् भागवताच्या आरतीने कथेच्या दुसर्‍या पर्वाला शेकडो भक्तांच्या उपस्थितीत विराम झाला.

आज संगीतमय भागवत कथेचे तिसरे पर्व…- श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान बार्शी रोड बीड येथे सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाचे आज तिसरे पर्व आहे. भागवताचा खरा सार आजच्या कथा प्रवचनातून व्यक्त होणार असल्याने भाविक भक्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कथेचे आयोजक सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांनी मंदिर ट्रस्टच्या वतीने केले आहे.

COMMENTS