राज ठाकरेंसह नांदगावकरांना धमकीचे पत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंसह नांदगावकरांना धमकीचे पत्र

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौर्‍यांची घोषणा केल्यानंतर त्यांना विरोध वाढत असतांना, त्यांना काही दिवसां

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी
पुण्यात आढळला पती-पत्नीचा मृतदेह
दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौर्‍यांची घोषणा केल्यानंतर त्यांना विरोध वाढत असतांना, त्यांना काही दिवसांपूर्वी धमक्यांचे फोन आले होते. त्यानंतर आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना धमक्या आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. बाळा नांदगावकर यांना धमकीचे जे पत्र आले आहे ते हिंदीत आहे मात्र, त्यात उर्दू शब्दांचाही उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले आहे. या संदर्भात त्यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सकाळी भेट घेतली. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, धमकीचे पत्र आले आहे. मला तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यासोबतच राज ठाकरेंनाही जीवे मारण्याची धमकी पत्रातून दिली आहे. जीवे मारण्याची धमकीचे पत्र राजसाहेबांना काल दाखवले. काल संध्याकाळी पोलीस आयुक्त पांडे यांना भेटलो आणि त्यांच्याकडे संबंधित पत्र सोपवले. आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहूयात, असे नांदगावकर म्हणाले.

COMMENTS